SBI खातेधारकांनी घरबसल्या अपडेट करा KYC; अन्यथा बंद होणार अकाऊंट, जाणून घ्या प्रोसेस

SBI खातेधारकांनी घरबसल्या अपडेट करा KYC; अन्यथा बंद होणार अकाऊंट, जाणून घ्या प्रोसेस

भारतीय स्टेट बँकेनं (State Bank of India-SBI) आपल्या सर्व ग्राहकांनी 31मेपर्यंत केवायसी (KYC-Know Your Customer) अपडेट करावे अशी अधिसूचना जारी केली आहे. . या मुदतीतदेखील केवायसी न करणाऱ्या ग्राहकांची खाती फ्रीज केली जातील, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 04 मे : देशातील (India) सर्वात मोठी सार्वजनिक बँक (Largest PSU Bank) असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (State Bank of India-SBI) आपल्या सर्व ग्राहकांनी 31मेपर्यंत केवायसी (KYC-Know Your Customer) अपडेट करावे अशी अधिसूचना जारी केली आहे. देशातील कोरोना परिस्थितीमुळे यासाठीची मुदत 31 मेपर्यंत वाढवण्यात आली असून 31मेपर्यंत केवायसी अपडेट न केल्यास आपल्या खात्याची सेवा बंद होऊ शकते. या मुदतीतदेखील केवायसी न करणाऱ्या ग्राहकांची खाती फ्रीज केली जातील, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे.

घरबसल्या करा केवायसी :

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Corona Pandemic) देशात ठिकठीकाणी लॉकडाउन (Lockdown) करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना घराबाहेर पडून आपल्या बँक शाखेत येणं अडचणीचं ठरू शकतं. हे लक्षात घेऊन, बँकेनं ग्राहकांना त्यांची कागदपत्रे पोस्ट किंवा ईमेलद्वारे बँकेत पाठवून केवायसी अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध कारणांनी केवायसी करणं रखडलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ग्राहकांच्या केवायसी अपडेट्सची कागदपत्रे ई-मेल किंवा पोस्टाने आल्यास ती स्वीकारण्याची सूचनाही बँकेनं आपल्या सर्व 17 स्थानिक मुख्यालयांना दिल्या आहेत. ज्या खात्यांचं केवायसी अपडेट झालेलं नाही, अशी खाती 31मे पर्यंत फ्रीज करू नयेत, अशी स्पष्ट सूचना बँकेनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

केवायसी म्हणजे नो युवर कस्टमर अर्थात कोणत्याही बँकेत आपलं खातं उघडलं की खातेदाराला त्याचा मोबाइल नंबर, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड, पत्ता, ईमेल आदी माहिती द्यावी लागते. यात काही बदल झाल्यास त्याबाबतही बँकेला वेळोवेळी कळवणे आवश्यक असते.

31मे नंतर खाते फ्रीज होईल :

आतापर्यंत केवायसी अपडेट नसेल तर लगेच खातेदाराचं खातं फ्रीज करण्यात (Freeze) येत होतं, आता ही प्रक्रिया 31मेपर्यंत केली जाणार नाही, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.

किती दिवसात होतं केवायसी अपडेट :

बँक आपल्या ग्राहकांचे मूल्यांकन जोखमीच्या आधारावर करते. ज्या ग्राहकांबाबत अधिक जोखीम असते अशा ग्राहकांना दोन वर्षातून एकदा केवायसी अपडेट करणं आवश्यक असते. ज्या ग्राहकांची जोखीम कमी असते त्यांना आठ वर्षातून एकदा केवायसी अपडेट करावे लागते. ज्या ग्राहकांची जोखीम अगदीच कमी असते त्यांना दहा वर्षातून एकदा केवायसी अपडेट करावे लागते.

Published by: Kiran Pharate
First published: May 4, 2021, 4:11 PM IST

ताज्या बातम्या