कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट? ज्यांचे कोरोनामुळे झाले सर्वात जास्त नुकसान, एकूण 2.28 लाख कोटी बुडाले

कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट? ज्यांचे कोरोनामुळे झाले सर्वात जास्त नुकसान, एकूण 2.28 लाख कोटी बुडाले

अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट यांचे 2.28 लाख कोटी बुडाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नुकसान आणखी कोणत्याही अब्जाधिशाच्या कंपनीचे झालेले नाही

  • Share this:

मुंबई, 09 मे : गेल्या वर्षी लग्झरी गुड्स कंपनी एलवीएमएच (LVMH)चे चेअरमन आणि सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) एका रात्रीमध्ये जगभरातील टॉप-3 श्रीमंताच्या यादीमध्ये नाव मिळवल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. मात्र इतर व्यवसायांप्रमाणे 2020 हे वर्ष अरनॉल्ट यांच्यासाठीही चांगले राहीले नाही. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार (Bloomberg) अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट यांचे 2.28 लाख कोटी बुडाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नुकसान आणखी कोणत्याही अब्जाधीशाच्या कंपनीचे झालेले नाही. यानंतर सुद्धा अरनॉर्ल्ट जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी तिसऱ्या स्थानावर आहेत.

अरनॉल्ट यांच्याकडे एलवीएमएच या कंपनीची 50 टक्के भागीदारी आहे. त्याचप्रमाणे फॅशन हाऊस ख्रिश्चियन डायरचे जवळपास 97  टक्के शेअर्स त्यांच्याकडे आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे अरनॉल्ट यांची नेटवर्थ कमी झाली आहे.

कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट?

-अरनॉल्ट यांनी लग्झरी गुड्स मार्केटमध्ये 1984 मध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यांनी टेक्स्टाइल ग्रृपचे अधिग्रहण केले, ज्याच्याकडे ख्रिश्चियन डायरची देखील मालकी आहे

(हे वाचा-सोन्याचांदीच्या दरात शुक्रवारी मोठा बदल, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव)

-4 वर्षांनतर त्यांनी त्यांचे अनेक व्यवसाय विकून एलवीएमएच मध्ये कंट्रोलिंग स्टेक्स विकत घेतले.

-त्यांच्या कलाप्रेमाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे मॉडर्न आणि कंटेम्पररी चित्रांचे कलेक्शन आहे आणि त्यामध्ये पिकासो आणि वारहोलच्या चित्रांचा समावेश आहे.

-काही महिन्यांपूर्वी फ्रान्सची राजधानी पॅरिस याठिकाणी नोट्रे डॅम कॅथेड्रल चर्चमध्ये आग लागली होती, त्यावेली अरनॉल्ट यांनी 65 कोटी डॉलर दान केले होते. यावेळी गेट्स यांनी 35 अब्ज डॉलर दिले होते.

(हे वाचा-LockDown: या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार कापणार, मेपासून तीन महिन्यांसाठी निर्णय)

-मंदीच्या काळात जेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी मोठे नुकसान झेलत होते तेव्हा अरनॉल्ट यांनी ऐतिहासिकपणे त्यांचे करिअर घडवले होते.

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 9, 2020, 10:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या