मोठी बातमी! कोरोनामुळे नोकरी जाणाऱ्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या सरकारी योजनेचा फायदा

मोठी बातमी! कोरोनामुळे नोकरी जाणाऱ्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या सरकारी योजनेचा फायदा

सरकारने अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेचा (Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) लाभ घेण्यासाठीचा कालावधी 30 जून 2021 पर्यंत वाढवला आहे. यामुळे 40 लाखांपेक्षा अधिक कामगारांना फायदा होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणामुळे ज्यांची नोकरी गेली आहे, अशांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी (Industrial workers) अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत  (Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्रालयाने कोरोना व्हायरस संकटकाळात ईएसआईसी (Employees’ State Insurance Scheme- ESIC)मध्ये रजिस्टर्ड नोकरी गमावणाऱ्या नोकरदार वर्गाला बेरोजगारी बेनिफिट (Unemployment Benefit) देत दिलासा दिला आहे. हे बेनिफिट घेण्याची तारीख आता वाढवून 30 जून 2021 करण्यात आली आहे. यामध्ये ईएसआयसी मध्ये रजिस्टर्ड कामगारांना 50 टक्के अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 42 लाख कामगारांना फायदा होणार आहे.

अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत रोजगार गमावणाऱ्यांना सरकारकडून मदत मिळते. हा एक प्रकार बेरोजगारी भत्ता असतो. ज्याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळतो ज्यांना ESI योजनेअंतर्गत कव्हर असतो. म्हणजेच ज्याच्या मासिक पगारातून ESI योगदान कापले जाते.

(हे वाचा-'जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लागणार 5 वर्षे, गरिबीही वाधणार')

सरकारी नियमांनुसार या योजनेअंतर्गत आता तीन महिन्याच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 42 लाख कामगारांना फायदा होणार आहे. 24 मार्च ते 30 जून 2021 या दरम्यान नोकरी गेलेल्यांना हा फायदा होणार आहे. याआधी ही तारीख 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 होती. दरम्यान 24 मार्च आधी ज्यांची नोकरी गेली आहे, त्यांना अटल बीमित व्यक्ति कल्याण योजनेच्या मुख्य अटी लागू होणार आहेत.

(हे वाचा-फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधी मिळतेय गाडी खरेदी करण्याची संधी, मिळेल 100 % कर्ज)

कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार देशातील 12 कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात बेरोजगार झाले आहेत. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या 1.9 कोटी आहे. केवळ जुलै महिन्यात 50 लाख लोकं बेरोजगार झाले आहेत. अशावेळी फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या ज्यांची नोकरी गेली आहे, सरकारकडून त्यांना खुशखबरी मिळत आहे.

या कामगारांना नाही मिळणार फायदा

जरी एखादी व्यक्ती ESIC योजनेची लाभधारक असेल, मात्र कोणत्याही चुकीच्या व्यवहारामुळे तिला कंपनीतून काढून टाकले असेल, त्या व्यक्तीवर फौजदारी खटला दाखल असेल किंवा संबधित व्यक्तीने निवृत्तीच्या तारखेच्या आधी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

-विमाधारक व्यक्तीने नोकरी जाण्याआधी कमीतकमी 2 वर्षे नोकरी करणे गरजेचे आहे आणि ESI योगदान कमीत कमी 78 दिवस केलेले असणे गरजेचे आहे.

-नोकरी गेल्याच्या तारखेनंतर 30 दिवसानंतर या रकमेसाठी क्लेम करावा लागेल. पहिल्यांदा हा कालावधी 90 दिवस होता.

(हे वाचा-Credit-Debit कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 सप्टेंबरपासून बदलणार हे नियम)

-त्याचप्रमाणे आता याकरता क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीकडे जाण्याची गरज नाही. क्लेम थेट ESIC च्या शाखा कार्यालयामध्ये जमा केला जाऊ शकतो आणि शाखा स्तरावरच त्याचे व्हेरिफिकेशन देखील केले जाईल.

-क्लेमचा फॉर्म ऑनलाइन देखील सबमिट करता येईल. त्याचप्रमाणे ESIC वेबसाइटवर जाऊन या योजनेच्या लाभासाठी फॉर्म डाऊनलोड करू शकता

-फॉर्म सबमिट केल्यानंतर 15 दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यात क्लेमची रक्कम पाठवण्यात येईल. संबधित व्यक्तिची ओळख पटवण्यासाठी आधारचा वापर केला जाईल

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या