कोरोनाचा मोठा फटका! जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लागणार 5 वर्षे, गरिबीही वाढणार- जागतिक बँक

कोरोनाचा मोठा फटका! जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लागणार 5 वर्षे, गरिबीही वाढणार- जागतिक बँक

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यास 5 वर्षांचा कालावधी लागू शकेल. जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट (Carmen Reinhart) यांनी गुरुवारी अशी माहिती दिली.

  • Share this:

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यास 5 वर्षांचा कालावधी लागू शकेल. जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट (Carmen Reinhart) यांनी गुरुवारी अशी माहिती दिली. स्पेनची राजधानी मॅड्रिड याठिकाणी झालेल्या परिषदेत रेनहार्ट यांनी हे वक्तव्य केले. यादरम्यान ते म्हणाले की जवळपास 20 वर्षांत ही पहिली वेळ असेल जेव्हा गरिबीचे प्रमाण जागतिक स्तरावर वाढेल.

आर्थिक विषमता वाढेल

ते म्हणाले की, 'लॉकडाऊन संदर्भातील सर्व निर्बंध संपल्यानंतर, सुरुवातीला जलद गती दिसून येईल. तथापि, पूर्ण रिकव्हरीसाठी सुमारे 5 वर्षे लागू शकतात. रेनहार्ट म्हणाले की, काही देशांमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली ही मंदी जास्त काळ राहील. श्रीमंत देशांमधील गरीब कुटुंबांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागणार आहे कारण आर्थिक विषमता वाढेल. त्याचप्रमाणे श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशांची परिस्थितीही आव्हानात्मक असेल.

(हे वाचा-फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधी मिळतेय गाडी खरेदी करण्याची संधी, मिळेल 100 % कर्ज)

सप्टेंबरच्या सुरुवातीला, डन अँड ब्रँडस्ट्रिटच्या 'देशांमधील जोखीम आणि जागतिक परिस्थिती'च्या अहवालात म्हटले आहे की या पँडेमिकबाबत अद्याप कोणतेही वर्गीकरण करता येणार नाही. काही अर्थव्यवस्थांमध्ये, तिसऱ्या तिमाहीत काही व्यवहार सुधारले आहेत. याची माहिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय), Google मोबिलिटी आकडेवारी आणि मासिक आर्थिक डेटावरून मिळते

(हे वाचा-विदेशी बाजारात उतरले सोन्याचे दर, भारतात आज स्वस्त होणार सोने)

भारतात रिकव्हरी रेट चांगला परंतु संक्रमण वाढते

या अहवालात भारताबद्दल असे सांगण्यात आले आहे की, कोव्हिड -19 बाबतचा सुधारणा दर सर्वाधिक आहे. परंतु संक्रमण होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. कडक लॉकडाऊन उपायांचा परिणाम चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या तिमाहीतही दिसून येईल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 23.9 टक्क्यांची उच्चस्तरिय घट झाली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की भारतात ग्राहकांची मागणी आणि गुंतवणूक आधीच कमी होत आहे, लॉकडाऊनमुळे यावर परिणाम झाला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 17, 2020, 6:26 PM IST

ताज्या बातम्या