मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI Clerk Pre Exam 2021: कोरोनाचा फटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेतील भरती परीक्षा स्थगित

SBI Clerk Pre Exam 2021: कोरोनाचा फटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेतील भरती परीक्षा स्थगित

SBI CBO result 2020

SBI CBO result 2020

कोविड परिस्थितीमुळे सरकारी नोकऱ्यांची भरतीही पुढे ढकलली जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) वतीने घेण्यात येणारी ज्युनियर असोसिएट क्लार्क पदासाठीची प्रीलिम्स परीक्षा (SBI Clerk Pre Exam 2021) स्थगित करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 जून: देशात सध्या बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कोविड-19 मुळे (Covid-19) तर चांगल्या-चांगल्या पदांवर काम करणाऱ्यांना  नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे अनेक जण नवी नोकरी शोधत आहेत. कोविड परिस्थितीमुळे सरकारी नोकऱ्यांची भरतीही पुढे ढकलली जात आहे. परीक्षा घेणंच शक्य होत नसल्याने असं होतंय.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) वतीने घेण्यात येणारी ज्युनियर असोसिएट क्लार्क पदासाठीची प्रीलिम्स परीक्षा (SBI Clerk Pre Exam 2021) स्थगित करण्यात आली आहे. एसबीआयच्या वतीने एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करून परीक्षा स्थगित केल्याची माहिती देण्यात आली आहे. या आधीच्या नोटिफिकेशन अनुसार ही परीक्षा जून महिन्यात होणार होती. आता बँकेचा पुढचा आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित केल्याचं बँकेच्या नव्या नोटिफिकेशनमध्ये (New Notification) म्हटलं आहे.

त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार एसबीआयच्या अधिकृत sbi.co.in या वेबसाइटवर (Official Website) जाऊन नवं परीक्षा स्थगितीचं नोटिफिकेशन पाहू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क पदासाठी भरती करण्याचं नोटिफिकेशन 26 एप्रिल 2021 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिलला सुरू झाली होती. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2021 होती. या प्रक्रियेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियात एकूण 5000 पदं भरण्यात येणार होती.

हे वाचा-कोरोनाग्रस्तांना SBI मधून मिळेल 5 लाख रुपयांपर्यंतचा फायदा, वाचा कसं कराल अप्लाय

नोटिफिकेशनमध्ये म्हटल्याप्रमाणे ज्युनिअर असोसिएट क्लार्क पदासाठी 4915 जागा भरण्यात येणार असून त्यापैकी 2109 जनरल कॅटेगरीतील (General), 1181 ओबीसी (OBC) प्रवर्गातील, 480 ईडब्ल्युएस (EWS), 722 एससी (SC) प्रवर्गातील आणि 423 एसटी (ST) कॅटेगरीतील उमेदवारांना नोकरी देण्यात येणार आहे. तसंच ज्युनिअर असोसिएट क्लार्क स्पेशल रिक्रुटमेंट ड्राइव्हअंतर्गत 85 जागा उपलब्ध आहेत. अशाप्रकारे 5 हजार उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. ज्यांना या नोकरीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांना बँकेच्या नोटिफिकेशनमध्ये अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहिती मिळेल.

हे वाचा-सोन्याचांदीच्या दरात मोठी उसळी, सोनं 50 हजारांच्या जवळपास तर चांदी 72 हजारांवर

निवडीची पद्धत

नोटिफेकेशननुसार या पदांसाठी ऑनलाईन प्रीलिम्स आणि मुख्य परीक्षा (SBI Preliminary & Main exam) घेतली जाणार आहे. त्यानंतर स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल. 100 मार्कांची प्रीलिम परीक्षा ऑब्जेक्टिव स्वरूपाची असेल. एक तासाच्या परीक्षेचे तीन वेगवेगळे विभाग असतील. या परीक्षेची पद्धत जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन पहावं.

First published:

Tags: SBI, Sbi bank job