Home /News /money /

नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी काही दिवसात स्वस्तात फोन खरेदीची संधी? कंपन्या बंपर डिस्काऊंट देऊ शकतात

नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी काही दिवसात स्वस्तात फोन खरेदीची संधी? कंपन्या बंपर डिस्काऊंट देऊ शकतात

आगामी सणासुदीच्या काळात स्मार्टफोन खरेदीदारांना मोठ्या सवलतींसह मोबाईल फोन खरेदी करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.

    मुंबई, 27 जून : नवीन स्मार्टफोन (Smartphones) खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थोडी वाट पाहा. कारण काही दिवस थांबल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. मार्केट एक्सपर्ट आणि किरकोळ विक्रेत्यांच्या मते, आगामी सणासुदीच्या काळात स्मार्टफोन खरेदीदारांना मोठ्या सवलतींसह मोबाईल फोन खरेदी करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे (Inflation) जगभरातील मागणी कमी झाल्यामुळे मोबाइल कंपन्यांकडे बराच साठा जमा झाला आहे. अशा स्थितीत जमा झालेला स्टॉक काढून टाकण्यासाठी कंपन्या ग्राहकांना भरघोस सूट देऊ शकतात. कंज्यूमर मार्केटच्या ट्रेंड्सवर नजर ठेवणारे स्ट्रॅटजी अॅनालिटिक्स राजीव नायर म्हणाले की, 2022 च्या उत्तरार्धात आगामी सणासुदीच्या हंगामात भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन सेलमध्ये डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कमाईवरील कमकुवतपणाचा प्रभाव भरून काढण्यासाठी ब्रँड आगामी सणासुदीच्या हंगामाचा वापर करतील. IKEA स्टोअर बाहेर जमलेली गर्दी पाहून व्हाल थक्क! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल स्ट्रॅटेजी अॅनालिस्ट अभिलाष कुमार यांनी सांगितले की, ब्रँड त्यांच्या वेबसाइट किंवा ऑफलाइन स्टोअरद्वारे फोनच्या विक्रीसाठी आकर्षक EMI पर्याय देऊ शकतात. जास्त डिस्काऊंट देऊन साठलेला स्टॉक कमी करण्याचा एक मार्ग आहे. Nepal Bans Pani Puri: नेपाळमध्ये पाणीपुरी विक्रीवर बंदी, काय आहे संपूर्ण प्रकरण? ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांनी देखील पुष्टी केली आहे की स्टॉक जमा झाला आहे आणि स्मार्टफोन ब्रँड्सने जूनमध्ये ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांसाठी मार्जिन वाढवले ​​आहे. उच्च मार्जिनसह, किरकोळ विक्रेते त्यांच्या ग्राहकांना अधिक सवलत देऊ शकतील. चीनमधील स्मार्टफोन निर्मात्यांनीही भरपूर इन्व्हेंटरी जमा केली आहे आणि ते पूर्व युरोपमध्येही मोबाईल विकण्यासाठी धडपडत आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Smartphone, Tech news

    पुढील बातम्या