मुंबई, 14 नोव्हेंबर: भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. पालक आपल्या मुलांना चांगलं शिक्षण आणि चांगली जीवनशैली देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण या महागाईच्या युगात आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं सोपं नाही. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला LIC च्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत, जी बालदिनानिमित्त तुमच्या मुलासाठी सर्वोत्तम भेट ठरू शकते.
या योजनेमुळे तुम्ही तुमच्या मुलांना चांगले आणि सुरक्षित भविष्यच देऊ शकत नाही तर त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकता. 'न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन 832' असं या प्लॅनचं नाव आहे. या अंतर्गत तुम्ही दररोज 206 रुपये गुंतवून 27 लाख रुपयांचा निधी गोळा करू शकता. मुलं कमी असताना त्यांच्या नावावर केलेली ही छोटी गुंतवणूक पुढं जाऊन खूप उपयोगी ठरू शकते. भविष्यात मुलांचं उच्च शिक्षण तसेच इतर खर्च इत्यादीसाठी हा निधी उपयोगी ठरू शकतो. हीच तुमच्या मुलांना बालदिनाची खऱ्या अर्थांनं भेट ठरेल.
25 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे मिळतील-
मुलाचे वय 25 पूर्ण झाल्यानंतर या पॉलिसीचे पैसे मिळतील. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाचे वय 12 वर्षे असेल, तर ही पॉलिसी 13 वर्षांनी परिपक्व होईल. दुसरीकडे जर मुलाचं वय पाच वर्षे असेल, तर पॉलिसी 20 वर्षांनी परिपक्व होईल. जर तुम्ही 14 लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला जवळपास 27 लाख रुपये मिळतील.
हेही वाचा: ATMमधून 2000 रुपयांच्या नोटा का झाल्या गायब? RBI ने सांगितलं कारण
हे आहे पॉलिसीचं खास वैशिष्ट्य-
एलआयसीच्या या नवीन पॉलिसीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या अंतर्गत तुम्हाला दररोज फक्त 206 रुपये गुंतवावे लागतील. एवढेच नाही तर पॉलिसीमध्ये प्रवेशाचे किमान वय शून्य वर्षे आणि कमाल वय 12 वर्षे आहे.
पॉलिसी अंतर्गत दररोज 206 रुपये गुंतवून तुमच्याकडे 27 लाख रुपयांचा निधी असेल. हा निधी तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी ठेवू शकता किंवा त्यांच्या शिक्षणावरही खर्च करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Children Day, Investment, LIC