मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Alert! 1 सप्टेंबरपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, RBI चा नवा नियम लागू करणार बँका

Alert! 1 सप्टेंबरपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, RBI चा नवा नियम लागू करणार बँका

RBI positive pay system- आता 1 सप्टेंबरपासून 50000 पेक्षा जास्तचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचं पालन करावं लागणार आहे.

RBI positive pay system- आता 1 सप्टेंबरपासून 50000 पेक्षा जास्तचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचं पालन करावं लागणार आहे.

RBI positive pay system- आता 1 सप्टेंबरपासून 50000 पेक्षा जास्तचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचं पालन करावं लागणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: तुम्ही देखील पैसे पाठवण्यासाठी चेकचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 1 सप्टेंबरपासून 50000 रुपयांपेक्षा जास्तचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचं पालन करावं लागणार आहे.  बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम (positive pay system) लागू होणार आहे. देशातील एक महत्त्वाची बँक असणारी Axis Bank देखील पॉझिटिव्ह पे सिस्टिम पुढील महिन्यापासून लागू करत आहे. बँकेने एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक ट्रंकेशन सिस्टमसाठी (CTS) ऑगस्ट 2020 मध्ये पॉझिटिव्ह पे प्रणालीची घोषणा केली होती. या नियमानुसार, बँकेच्या सर्व खातेधारकांना 50 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकसाठी  जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. बँकेने चेक पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.

हे वाचा-Facebook वर बिझनेस करणाऱ्यांनी व्हा सावध! वाचा हा Cyber Fraud चा किस्सा

आरबीआयच्या नियमानुसार, चेक जारी करण्यााधी तुम्हाला बँकेला याबाबत सूचित करावे लागेल अन्यथा चेक स्विकार केला जाणार नाही. या सिस्टममध्ये 50 हजारहून अधिकच्या चेक पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावं लागेल. या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल. त्याद्वारे चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील. चेकचं पेमेंट करण्याआधी हा तपशील पुन्हा तपासला जाईल. जर यामध्ये काही गोंधळ असल्यास चेक रिजेक्ट होईल. ही सुविधा पूर्णपणे ऐच्छिक असेल. दरम्यान या नियमामुळे वरिष्ठ नागरिकांवर विशेष प्रभाव पडेल, खासकरुन जे अद्याप नेट बँकिंग वापरत नाहीत.

हे वाचा-जालन्याच्या डॉक्टरची कमाल! सोलर कुकीज करत महिलांना दिला रोजगार, लाखोंची उलाढाल

पॉझिटिव्ह पे सिस्टिम चेक ट्रंकेशन सिस्टिम अंतर्गत चेक क्लिअरिंगमध्ये फ्रॉडपासून सुरक्षा उपलब्ध करण्यासाठी आहे. चेक ट्रंकेशन सिस्टिम चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया आहे.

या बँकांनी लागू केला नियम

अॅक्सिस बँकेसह (Axis Bank) काही बँकांनी 50 हजारांपेक्षा जास्त धनादेशांसाठी पीपीएस अनिवार्य केले आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना नेट/मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेला भेट देऊन बँकेला चेक तपशील द्यावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टिम 50000 किंवा त्यापेक्षा मोठ्या रकमेच्या चेक पेमेंटसाठी असणार आहे. मात्र Axis बँकेत पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेसाठी पीपीएस अनिवार्य असणार आहे.

हे वाचा-ITR न भरल्यामुळे द्यावा लागतोय अधिक TDS? हा आहे समस्येवरचा उपाय

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँकेने 50,000 रुपयांच्या वरील धनादेशांसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. सध्या या बँकांनी ही प्रणाली ग्राहकांसाठी पर्यायी ठेवली आहे. हा नियम लागू करण्याचा हेतू ग्राहकांची सुरक्षा आहे. ही प्रणाली चेक फसवणूक रोखण्यासाठी मदतीची ठरेल

First published:

Tags: Axis Bank, Bank, Bank details, SBI