जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सामान्यांना मोठा दिलासा! उतरले डाळींचे दर, वाचा किती कमी झाल्या उडीद, चणा आणि तुरडाळींच्या किंमती

सामान्यांना मोठा दिलासा! उतरले डाळींचे दर, वाचा किती कमी झाल्या उडीद, चणा आणि तुरडाळींच्या किंमती

सामान्यांना मोठा दिलासा! उतरले डाळींचे दर, वाचा किती कमी झाल्या उडीद, चणा आणि तुरडाळींच्या किंमती

सर्वात जास्त घसरण उडीद आणि चणाडाळीच्या किंमतीत झाली आहे. एप्रिल महिन्यात चणाडाळीच्या किंमतींमध्ये रेकॉर्ड लेव्हलवरून 20 टक्के घसरण पाहायला मिळाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जुलै: सामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सातत्याने वाढणाऱ्या डाळीच्या किंमतीमध्ये (Price of pulses) घसरण झाली आहे. सर्वात जास्त घसरण उडीद आणि चणाडाळीच्या किंमतीत झाली आहे. एप्रिल महिन्यात चणाडाळीच्या (Chana prices) किंमतींमध्ये रेकॉर्ड लेव्हलवरून 20 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. याशिवाय उडद डाळीच्या किंमतीमध्ये देखील 20 टक्के घसरण झाली आहे. कोरोना काळात (Coronavirus) मागणी कमी झाल्यान डाळींच्या किंमती उतरल्या आहेत. चणा डाळीच्या किंमती एमएसपीच्या स्तरावर 5,100 रुपये प्रति क्विंटलच्या खाली आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात चण्याचा किंमतींवर दबाव राहण्याची शक्यता आहे. कोविडच्या तिसर्‍या लाटेदरम्यान संभाव्य घसरण आणि फेस्टिव्ह सीझनआधी होणारी मागणी यामुळे आणखी किंमती वाढविण्याची शक्यता आहे. नाफेड देखील करत विक्री भारतीय डाळी आणि धान्य असोसिएशनचे अध्यक्ष जीतू भेडा म्हणाले, कोविडमुळे मागणी कमी झाली आहे शिवाय नाफेडने स्थानिक बाजारपेठेत चणा विक्रीला सुरुवात केली आहे, ज्यामुळे किंमती खाली आल्या आहेत. ते म्हणाले की या सर्व बाबींमुळे बाजारात तणावाचं वातावरण आहे. हे वाचा- Bank Privatisation: मोठी बातमी! या बँका होणार खाजगी, पावसाळी अधिवेशनात निर्णय इंदूरमध्ये ऑल इंडिया डाळी मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी असं म्हटलं आहे की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपायांमुळे डाळींच्या वापरावर परिणाम झाला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘यावेळी किंमती 5000 रुपयांच्या आसपास आहे आणि यापुढे आणखी कमी होतील अशी शक्यता नाही कारण पुढील पीक येण्यास अजून वेळ आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार होण्याची भीती आणि सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे चण्याच्या वापरामध्येही वाढ होण्याची शक्यता कमी आहे’. तुर आणि मुगडाळीच्या किंमती उतरल्या त्यांनी पुढे अशी माहिती दिली की तुर आणि मुगडाळीच्या किंमती देखील उतरल्या आहेत. अग्रवाल यांनी असं म्हटलं आहे की, दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रगतीच्या आधेर चणाबाजारात सुधारणा होऊ शकते. वायदे बाजारात गेल्या काही सत्रांपासून चण्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. हे वाचा- सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ, महिन्याभरात व्हाल मालामाल; वाचा सविस्तर का घटल्या उडीद डाळीच्या किंमती? 15 मे पासून उडीद डाळीच्या किंमतीत 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. चेन्नईच्या एका डाळ आयातदाराने अशी माहिती दिली की, ‘जेव्हा केंद्राने घोषणा केली होती की खुल्या सामान्य परवान्याअंतर्गत डाळींची आयात करण्यास परवानगी दिली जाईल, तेव्हा चेन्नईमध्ये उडीद डाळीच्या किंमती  86,000 रुपयांवरून 12,000 रुपये प्रति टन घसरल्या होत्या.’ सध्या महानगरांमध्ये उडीद डाळीत्या किंमती 67,000 रुपये प्रति टन आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात