• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • तुमच्या फायद्याची बातमी! गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा या 10 महत्त्वाच्या गोष्टी

तुमच्या फायद्याची बातमी! गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा या 10 महत्त्वाच्या गोष्टी

आपली कष्टाची संपत्ती सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या बाबी काळजीपूर्वक बघणे आवश्यक आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 20 सप्टेंबर : कोणतीही आर्थिक गुंतवणूक (Investment) करताना जास्तीत जास्त परतावा मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामुळे अनेकदा अधिक परताव्याच्या (Returns) आशेनं चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून लोक फसतात आणि नंतर पश्चात्ताप होतो. आपली कष्टाची संपत्ती सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या बाबी काळजीपूर्वक बघणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचे आहे ते गुंतवणुकीसाठी निवडलेला पर्याय. सुरक्षिततेला प्राधान्य असेल तर फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit-FD) अर्थात मुदत ठेव हा एक उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड (Mutual Funds) आणि शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्याची जोखीम घेण्याची इच्छा नसलेले लोक मुदत ठेवीला पहिली पसंती देतात. यावरील व्याजदर कमी असला तरी गुंतवणूकीसाठी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो, मात्र यात गुंतवणूक करतानादेखील खालील 10 मूलभूत गोष्टींची (10 Important Things) माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवरील परताव्यावर होत असतो. कालावधी (Term) : मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्या योजनेची योग्य मुदत निवडणे गरजेचे आहे. याचा कालावधी 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत असतो. तुम्ही तुमच्या गरजा लक्षात घेऊन हा कालावधी निवडणं महत्त्वाचं असतं. तुम्ही दीर्घकाळासाठी एफडी केली आणि ती आधीच मोडण्याची गरज पडली तर त्यावरील व्याजाचं उत्पन्न (Interest Return) कमी होते. ठेव रक्कम : या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येक बँकेची किमान ठेव रक्कम (Minimum Deposit) वेगळी आहे. स्टेट बँकेत अगदी एक हजार रुपयेही गुंतवता येतात. तर आयसीआयसीआय बँकेत किमान 10 हजार रुपये ठेवावे लागतात. एचडीएफसी बँकेत किमान 5 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवावी लागते. Petrol Price Today:पेट्रोल-डिझेल दराबाबत दिलासा नाहीच,सलग 15व्या दिवशी भाव स्थिर व्याज दर : मुदत ठेवीसाठी कालावधीनुसार वेगवेगळे व्याज दर (Interest Rates) असतात. त्यामुळे ठेव ठेवण्यापूर्वी व्याजदर जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का व्याजदर अधिक असतो. कर सवलत : प्राप्तिकर स्लॅबनुसार (Income Tax Slab) व्याजाचे उत्पन्न करपात्र असते. तुमचे व्याजाचे उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक त्यावर टीडीएस (TDS) कापू शकते. तुम्हाला टीडीएस वजा करायचा नसेल तर तुम्हाला बँकेत 15G किंवा 15H फॉर्म भरणे आवश्यक असते. बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी केलेल्या मुदत ठेवीवर कोणताही कर बसत नाही. मुदतीपूर्वी पैसे काढणे : मुदत ठेवीची मुदत संपण्यापूर्वी (pre Mature FD) तुम्ही पैसे काढू शकता, परंतु यासाठी तुम्हाला काही रक्कम दंड म्हणून भरावी लागते. ही रक्कम साधारणपणे 1 ते 1.5 टक्के असते. काही बँका विशिष्ट कालावधीनंतर काढलेल्या रकमेवर कोणताही दंड आकारत नाहीत. 1 लाखात सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 40000 हून अधिक नफा; पाहा डिटेल्स पैसे मिळण्याचे पर्याय : मुदत ठेव योजनेची मुदत संपल्यानंतर तुम्ही व्याजासह संपूर्ण गुंतवणूक रक्कम एकदम काढू शकता. किंवा मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक पद्धतीनं घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. कर्ज सुविधा : मुदत ठेवीवर कर्जही (Loan) घेता येते. ठेव रकमेच्या 90-95 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. अर्थात कर्जाच्या ओव्हरड्राफ्टची (Overdraft) रक्कम एफडीच्या रकमेपेक्षा कमी असते आणि त्यावर आकारण्यात येणारा व्याज दरही जास्त असतो. नूतनीकरण : मुदत ठेवीचे दरवर्षी आपोआप नूतनीकरण (Renew) होते. आजकाल, जवळजवळ सर्व बँका मुदत ठेव ठेवण्यासाठी आणि मुदत संपल्यानंतर पुन्हा तिचे नूतनीकरण करण्यासाठी म्हणजे ती रक्कम पुन्हा नवीन कालावधीसाठी गुंतवण्याकरता ऑनलाइन सुविधा देतात. तुमचं Aadhaar-Pan कार्ड लिंक आहे का? नसेल तर मिनिटांत असं करा लिंक नामनिर्देशन : मुदत ठेवीसाठी तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींचे नामनिर्देशन (Nomination) करू शकता. ठेव ठेवतानाच त्या व्यक्तीची नोंदणी करणे आवश्यक असते. कारण ठेवीदाराचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला ठेवीची रक्कम मिळण्यात अडचण येऊ शकते. संरक्षण : गुंतवणूक करताना तुम्ही ज्या बँकेत किंवा ज्या योजनेत पैसे जमा करत आहात, त्याबाबत चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची कष्टाची पुंजी बुडू नये यासाठी तुम्ही गुंतवणूक करत असलेली संस्था किंवा योजना किती सुरक्षित (Secure) आहे, याची खात्री करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
First published: