मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Prices Today: crude oil महाग होत असताना मुंबई-पुण्यात काय आहे petrol-diesel दर

Petrol Diesel Prices Today: crude oil महाग होत असताना मुंबई-पुण्यात काय आहे petrol-diesel दर

Petrol Diesel Prices Today: आज जारी करण्यात आलेला इंधन दर मागील जवळपास तीन महिन्यांपासून स्थिर आहे. कंपन्यांकडून दररोज दर जारी केले जातात. देशातील विविध शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव वेगवेगळा असतो.

Petrol Diesel Prices Today: आज जारी करण्यात आलेला इंधन दर मागील जवळपास तीन महिन्यांपासून स्थिर आहे. कंपन्यांकडून दररोज दर जारी केले जातात. देशातील विविध शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव वेगवेगळा असतो.

Petrol Diesel Prices Today: आज जारी करण्यात आलेला इंधन दर मागील जवळपास तीन महिन्यांपासून स्थिर आहे. कंपन्यांकडून दररोज दर जारी केले जातात. देशातील विविध शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव वेगवेगळा असतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. आज जारी करण्यात आलेला इंधन दर मागील जवळपास तीन महिन्यांपासून स्थिर आहे. कंपन्यांकडून दररोज दर जारी केले जातात. देशातील विविध शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव वेगवेगळा असतो.

सरकारने 15 जून 2017 पासून तेलाच्या किंमती बाजारा अधीन केल्या होत्या. त्यामुळे इंधन दर रोजच ठरू लागला. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या (Crude Oil) किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. क्रूड ऑइल 93 डॉलर प्रति बॅरलने महागलं आहे. कच्च्या तेलाचा हा दर गेल्या सात वर्षांतील उच्चांक आहे. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मागणीपेक्षा कमी जागतिक पुरवठा, रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढता तणाव आणि अमेरिकेतील खराब हवामान यामुळे क्रूडच्या किमती सातत्याने वाढत आहेत. परंतु क्रूड ऑइलचा दर वाढता असताना पेट्रोल-डिझेलचा भाव मागील तीन महिन्यांपासून स्थिर आहे.

हे वाचा - FD करण्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; तुमची भविष्यातील ध्येय गाठणे सोपं होईल

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

पुणे109.45 रुपये92.25 रुपये
मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
रायगड109.48 रुपये92.25 रुपये
परभणी112.49 रुपये95.17 रुपये
पालघर109.75 रुपये92.51 रुपये
सांगली110.03 रुपये92.83 रुपये
कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

हे वाचा - या नोकरदारांचे Work From Home चे दिवस संपले; तुम्हालाही जावं लागणार ऑफिसमध्ये?

सध्या दर वाढ नसले, तरी कमी देखील होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना 100 रुपयांहून अधिक किंमतीत पेट्रोल घ्यावं लागत आहे. वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतोच आहे. महागड्या क्रूडमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) वाढू शकतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोलियम कंपन्या अद्याप दरात वाढ करत नसल्याचे बोलले जात आहे. या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी लागणार आहेत. यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut, Petrol price, Petrol price hike