मराठी बातम्या /बातम्या /करिअर /या नोकरदारांचे Work From Home चे दिवस संपले; आता TCS, Infosys, Wipro, HCL कर्मचाऱ्यांनाही ऑफिसमध्ये जावं लागणार?

या नोकरदारांचे Work From Home चे दिवस संपले; आता TCS, Infosys, Wipro, HCL कर्मचाऱ्यांनाही ऑफिसमध्ये जावं लागणार?

8. जर तुमच्या घरात पश्चिम आणि नैऋत्य कोनांमध्ये अभ्यासाची खोली बनवणे शक्य नसेल, तर तुम्ही ती ईशान्येलाही बांधू शकता.

8. जर तुमच्या घरात पश्चिम आणि नैऋत्य कोनांमध्ये अभ्यासाची खोली बनवणे शक्य नसेल, तर तुम्ही ती ईशान्येलाही बांधू शकता.

देशातील कोविड -19 रुग्णसंख्येत आता घट झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे सरकारने (Government) आपल्या सर्व कर्मचार्‍यांना कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

  नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: देशात कोरोना संसर्गाची साथ (Coronavirus Pandemic) पसरल्यानंतर त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनसह (COVID-19 Lockdown) अनेक उपाययोजना लागू करण्यात आल्या. कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यात आली. त्यामुळे प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची अर्थात वर्क फ्रॉम होमची (Work From Home) परवानगी दिली. आज जवळपास दोन वर्षांनंतरही कोरोनाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे आजही अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरूनच काम करत आहेत. आता मात्र यात बदल होण्याची शक्यता आहे. कारण देशातील कोविड -19 रुग्णसंख्येत आता घट झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे सरकारने (Government) आपल्या सर्व कर्मचार्‍यांना कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

  देशात सध्या कोविड-19 रुग्णांची संख्या दररोज एक लाखापेक्षा कमी नोंदवली जात आहे. त्यामुळे सरकारने आता वर्क फ्रॉम होमची (WFH) सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे निर्णय जाहीर केला आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधीपासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे.

  हे वाचा-JOB ALERT: नाशिकमधील चलनी नोटांच्या कारखान्यात सेवानिवृत्त उमेदवारांसाठी Vacancy

  केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सरकारनं, सोमवार, 7 फेब्रुवारीपासून कार्यालयातून संपूर्ण काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने रविवारी, 6 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे.

  देशातील कोरोना विषाणूच्या साथीचा आढावा घेण्यात आल्यानंतर रुग्ण संख्या कमी झाल्यानं तसंच चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी झाल्यानं सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं डॉ. जितेंद्र सिंग यांनी जाहीर केलं आहे. 7 फेब्रुवारी 2022 पासून सर्व स्तरावरील कर्मचारी, कोणतीही सूट न देता, नियमितपणे कार्यालयात हजर राहतील, असं कार्मिक मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

  हे वाचा-शेतकऱ्याच्या पोरानं केली कमाल; बुलडाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत

  कर्मचारी कार्यालयात येतील तेव्हा त्यांना मास्क (Mask) आणि अन्य सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कर्मचारी नेहमी मास्क घालतील आणि कोविड नियमांचे पालन करतील याची जबाबदारी विभाग प्रमुखांची असेल. सध्याची मार्गदर्शक तत्त्वे 15 फेब्रुवारीपर्यंत लागू होतील, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

  'पूर्वीच्या परिपत्रकानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत 50 टक्के कार्यालयीन उपस्थितीला मान्यता देण्यात आली होती, मात्र संबंधित विभागांकडून मिळालेली माहिती आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) द्वारे एक नवीन ऑफिस मेमोरँडम (OM) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, सर्व स्तरावरील सर्व कर्मचारी, कोणतीही सूट न देता 7 फेब्रुवारी 2022 पासून कार्यालयात हजर राहतील. कोणत्याही कर्मचार्‍याला यापुढे वर्क फ्रॉम होमचा पर्याय नसेल,' असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

  सरकारच्या या निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील आयटी कंपन्या आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना जानेवारीपासून टीसीएससह बहुतेक आयटी कंपन्यांनी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ओमिक्रॉन प्रकारामुळे आलेल्या तिस-या लाटेनं पुन्हा हा निर्णय मागं घेणं कंपन्यांना भाग पडलं. देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS work from home) डिसेंबरमध्ये सांगितले होते की, त्यांचे 90 टक्के कर्मचारी घरून काम करत असून, कर्मचाऱ्याना कार्यालयात बोलावण्याची कोणतीही योजना ही 'कॅलिब्रेटेड मूव्ह' म्हणजे योग्य सांगड घालून केलेली असेल. कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन कंपनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं एचसीएल टेकनं (HCL Technologies) आधीच स्पष्ट केलं आहे.

  हे वाचा-Career Tips: तुमचंही B.Sc पर्यंत शिक्षण झालंय का? बघा पुढील करिअरच्या संधी

  कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य असून सध्या तरी कर्मचारी घरातून काम सुरू ठेवतील, असं कॉग्निझंटने (Conginizant) म्हटलं आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसनेही (Infosys) कोविड-19च्या परिस्थितीचा आढावा लक्षात घेऊन, कार्यालये पुन्हा सुरू करण्याची तयारी केली होती, त्याचबरोबर कंपनी घरून काम करण्याचाही पर्यायही खुला ठेवणार आहे. वर्षभर तरी वर्क फ्रॉम होम आणि ऑफिसात जाऊन कां करणे अशा दोन्ही पद्धतींमध्ये कामकाज चालेल, असं इन्फोसिसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि एचआर प्रमुख रिचर्ड लोबो यांनी म्हटलं आहे.

  First published:

  Tags: Corona, Coronavirus, Government employees, Work from home