मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्या Adhaar card वर दुसरं कुणी सिम वापरतंय का? दोन मिनिटात करा चेक

तुमच्या Adhaar card वर दुसरं कुणी सिम वापरतंय का? दोन मिनिटात करा चेक

तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम सक्रिय आहेत हे जाणून घेण्यासाठी सरकारने एक पोर्टलही तयार केले आहे. दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच एक पोर्टल टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) लाँच केले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 डिसेंबर : आपल्या माहिती नसताना आपल्या ओळखपत्रावर (Identity Card) विशेषत: आधार कार्डवर (Aadhaar Card) दुसरं कुणीतरी सिम कार्ड घेऊन ते वापरलं जात असतं. मात्र हे फार कमी जणांना माहिती असेल की तुमच्या आधार क्रमांकाशी किती मोबाईल सिम लिंक (Mobile Sim Link) आहेत, हे तुम्ही सहज ओळखता येऊ शकते. तुम्ही यापैकी कोणतेही सिम वापरत नसल्यास, तुम्ही ते बंद करू शकता.

तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम सक्रिय आहेत हे जाणून घेण्यासाठी सरकारने एक पोर्टलही तयार केले आहे. दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच एक पोर्टल टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे, यूजर्स त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात.

सावधान! तुम्हाला मिळालेलं Job Offer Letter खोटं तर नाही ना? 2 मिनिटांत असं करा चेक

TAFCOP वेबसाइटद्वारे, तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम जारी केले आहेत हे सहजपणे शोधू शकता. तुमच्या नकळत तुमच्या आधार क्रमांकाशी कोणताही मोबाइल क्रमांक जोडला गेला असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचा जुना आणि न वापरलेला क्रमांक तुमच्या आधारमधून सहजपणे वेगळे करू शकता.

लक्ष द्या! ऑफिसमध्ये चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा खराब होईल तुमची इमेज; वाचा सविस्तर

लिंक केलेले सिम कसे तपासायचे?

>> तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाइल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जाणे आवश्यक आहे.

>> येथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल.

>> यानंतर तुम्हाला 'Request OTP' बटणावर क्लिक करावे लागेल.

>> यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल.

>> त्यानंतर, तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.

>> जेथे यूजर वापरात नसलेले किंवा यापुढे आवश्यक नसलेले नंबर नोंदवू शकतात आणि ब्लॉक करू शकतात.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, Sim