Home /News /career /

लक्ष द्या! ऑफिसमध्ये चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा खराब होईल तुमची इमेज; वाचा सविस्तर

लक्ष द्या! ऑफिसमध्ये चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा खराब होईल तुमची इमेज; वाचा सविस्तर

 गोष्टींमुळे होऊ शकते इमेज खराब

गोष्टींमुळे होऊ शकते इमेज खराब

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, नेहमी तुमच्या प्रतिमेची काळजी घ्या.

    मुंबई, 11 डिसेंबर: करिअरमध्ये सतत प्रगती (Success) करण्यासाठी तुमच्या सवयी आणि इमेज (How to make better career) यावर खूप काम करण्याची गरज आहे. कधीकधी आपल्या काही वाईट सवयींमुळे (bad habits) आपण आपल्या करिअरमध्ये खूप मागे राहतो. तुमच्यासोबत काम करणारे लोक बढती (Promotion Tips) आणि वेतनवाढीच्या बाबतीत तुमच्यापेक्षा पुढे जात असतील, तर तुम्ही तुमच्या वागण्याचा एकदा आढावा घ्यावा (Behavior to Avoid in Office) तुमच्या काही सवयीमुळे तुम्ही मागे राहतात का? तुमच्या बॉस आणि कर्मचार्‍यांच्या चांगल्या पुस्तकांमध्ये समाविष्ट होण्यासाठी, ऑफिसमधली तुमची इमेज खूप खास असावी (How to maintain Office Image). तुमच्या स्वभावाचा असा कोणताही भाग नसावा, ज्यामुळे तुमच्या करिअरवर परिणाम होऊ लागतो. करिअरमध्ये चांगली वाढ होण्यासाठी स्वत:चाही आढावा घेत राहणे आवश्यक आहे (career Tips). जाणून घ्या, तुमच्या कोणत्या सवयी तुमच्या करिअरवर नक्कीच परिणाम करतात. जर तुम्हालाही अशा सवयी असतील तर आता तुमची प्रतिमा सुधारणे चांगले होईल. ऑफिसमध्ये इमेजची काळजी घ्या तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, नेहमी तुमच्या प्रतिमेची काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा नकारात्मक, चिडचिड किंवा खराब होऊ देऊ नका. नोकरीची मोठी संधी! कोकण रेल्वेमध्ये या पदांच्या 18 जागांसाठी पदभरती; जाणून घ्या वेळेची काळजी घ्या जर तुम्ही दररोज उशिरा कार्यालयात पोहोचलात तर ते तुमच्या करिअरला नुकसान पोहोचवू शकते. या सवयीमुळे ऑफिसमधील लोक तुम्हाला कोणत्याही प्रकारची जबाबदारी देण्यास घाबरतील. तुम्हाला कोणत्याही कारणास्तव उशीर झाल्यास, तुमच्या रिपोर्टिंग बॉसला उशीर होण्याचे नेमके कारण सांगा. फ्लर्टिंग टाळा  ऑफिसमध्ये लोकांसोबत हसणे ही चांगली गोष्ट आहे, पण काम करण्याऐवजी सहकाऱ्यांसोबत फ्लर्ट करत राहिल्यास या सवयीमुळे खूप नुकसान होऊ शकते. अर्थात ऑफिसमध्ये हसत-मस्करी करा, पण त्याचा तुमच्या कामावर किंवा इतरांच्या कामावर परिणाम होऊ नये हे लक्षात ठेवा. फोनवर जास्त व्यस्त राहू नका ऑफिसच्या कामादरम्यान जर तुम्ही फोनवर किंवा सोशल मीडियावर जास्त वेळ व्यस्त असाल तर ती चांगली गोष्ट नाही. तुमची ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही Politics ची प्रचंड आवड आहे? मग निवडणूक न लढवताही करू शकता करिअर चुगली करू नका  ऑफिसमध्ये काम करताना एखाद्याची चुगली केली तर ते भविष्यासाठीही चांगले नाही. ऑफिसमध्ये कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्या पदाची काळजी घ्या. तुम्ही कोणत्या पदावर आहात आणि तुमची जबाबदारी काय आहे यानुसार इतरांशी वागा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career

    पुढील बातम्या