Home /News /career /

सावधान! तुम्हाला मिळालेलं Job Offer Letter खोटं तर नाही ना? 2 मिनिटांत असं करा चेक

सावधान! तुम्हाला मिळालेलं Job Offer Letter खोटं तर नाही ना? 2 मिनिटांत असं करा चेक

तुम्हाला आलेल्या ऑफर लेटरमध्ये या गोष्टी नक्की तपासा.

तुम्हाला आलेल्या ऑफर लेटरमध्ये या गोष्टी नक्की तपासा.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Identify fake offer letter) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही खऱ्या आणि खोट्या Job Offer Letter मध्ये फरक ओळखू शकाल.

    मुंबई, 11 डिसेंबर: आजकालच्या काळात तरुणांना रोजगाराची संधी (Job Opportunity) उपलब्ध होणं म्हणजे पर्वणीच. कोरोनामुळे अनेक जणांचे जॉब्स (latest Jobs) गेले आहेत गटार काही जणांचे पगारही (best salary jobs) कमी झाले आहेत. मात्र ज्यांना या काळातही जॉब्स मिळत आहेत ते खरे नशीबवान. सध्या अनेक क्षेत्रांमध्ये जॉब उपलब्ध होत आहेत. मात्र त्याचबरोबर फसवणुकीचे (Fraud in Jobs) प्रकारही वाढत चालले आहेत. गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि गर्व्हन्मेन्ट नोकरीच्या (Government Jobs) नावावर अनेकांची फसवणूक होत आहे. डिजिटल युगात तर गुन्हेगारही डिजिटल झाले आहेत. सध्या तरुणांच्या ई-मेल आयडीवर Fake Job Offer Letter पाठवून अनेकांना गंडवलं जात आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Identify fake offer letter) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही खऱ्या आणि खोट्या Job Offer Letter मध्ये फरक ओळखू शकाल. त्यामुळे तुम्हाला आलेल्या ऑफर लेटरमध्ये या गोष्टी नक्की तपासा. अपेक्षेपेक्षा अधिक पगार   ऑनलाइन फसवणूक करणारे लोक जास्त पगाराच्या नोकऱ्यांचे खोटे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळतात. जर तुम्हाला नोकरीच्या ऑफरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज दिले जात असेल तर सावध व्हा. अनेक कंपन्या उमेदवारांना केवळ पैशाचे आमिष दाखवून आपल्या तावडीत अडकवतात. ऑफर लेटरमध्ये कुठेतरी कमी शिकलेल्या आठवी-दहावी पास उमेदवाराला महिन्याला ५० हजार रुपयांची नोकरी किंवा परदेशात तुमच्यासाठी दीड लाख रुपयांचे पॅकेज, मोफत राहणे आणि जेवणाचे पॅकेज अशी चर्चा आहे का? अशा आकर्षक ऑफर्सच्या ईमेलला उत्तर देताना काळजी घेण्याची गरज आहे. स्वतःचे विचार आता इतरांपर्यंत पोहोचवा; सुरु करा Blogging; कमवा भरघोस पैसे खोटा ई-मेल आयडी किंवा पत्ता जेव्हा जेव्हा तुम्हाला नोकरीची ऑफर येते तेव्हा कंपनीचा ईमेल नीट वाचा. फक्त पगार किंवा पॅकेजकडे लक्ष देऊ नका, तर कंपनीच्या नियम आणि अटी देखील वाचा. कंपनीचा पत्ता आणि संपर्क क्रमांक पहा आणि शंका असल्यास त्या पत्त्यावर जाऊन तपासा. फेक जॉब लेटरमध्ये कंपन्या, वेबसाइट्सच्या URL अस्तित्वात नसतात. जॉब प्रोफाइल करा चेक  अनेक वेळा तुम्हाला ऑफर लेटरमध्ये फक्त पैसे दिसतात, त्यामुळे पैशांसोबत पोस्टकडेही लक्ष द्या. तुमच्या कामाच्या क्षेत्रानुसार पोस्टचा मागोवा ठेवा आणि तुम्हाला काही वेगळ्या पोस्ट दिसल्यास अलर्ट व्हा. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेव्हा बनावट ऑफर लेटरद्वारे लोक परदेशात अडकले होते. म्हणून, नोकरीच्या ऑफरमधील पोस्ट बद्दल निश्चितपणे संपूर्ण माहिती गोळा करा. शुल्क मागितल्यास व्हा सावध देशातील किंवा जगातील कोणतीही कंपनी कोणत्याही नोकरीच्या ऑफरसह कर्मचाऱ्याकडून पैसे घेत नाही. पण फसवणूक करणाऱ्या कंपन्या अनेकदा पैशांची मागणी करतात. तुमच्या जॉब ऑफरमध्ये कोणतेही शुल्क विचारले असल्यास, त्या कंपनीशी संपर्क साधा आणि ते तपासा. तुमच्याकडे कोणत्याही स्वरुपात पैसे मागितले जात असतील तर तुमची फसवणूक होऊ शकते हे समजून घ्या. जेव्हा जेव्हा एखादी विश्वसनीय कंपनी मेलद्वारे नोकरी ऑफर करते तेव्हा त्यात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs

    पुढील बातम्या