नवी दिल्ली, 25 मार्च : कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक प्रयत्न करत आहे. केंद्राने देखील या काळात अनेकांच्या फायद्याचा असा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 80 कोटी लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली की, 80 कोटी लोकांना 27 रुपये किंमतीचा गहू 2 रुपये प्रति किलो तर 37 रुपये किलोग्राम किंमतीचे तांदुळ 3 रुपये प्रति किलो रुपये दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत केंद्राचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. जावडेकर यांनी असं म्हटलं की, ‘ केंद्र सरकारने राज्य सरकारांना 3 महिन्याचा आगाऊ सामान खरेदी करण्यास सांगितले आहे.’ (हे वाचा- कोरोना लॉकडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानाचा आकडा तुमच्या कल्पनेच्या पलीकडील! ) प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार पीडीएसच्या माध्यमातून देशातील 80 कोटी जनतेला ही मदत देऊ करणार आहे. कोणत्याही सामानाचा तुटवडा पडू नये यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहेत. लॉकडाऊन सध्याच्या काळात गरजेचे असल्याचंही ते म्हणाले. तीन महिन्याचं धान्य पुरवण्यात येणार असून अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे आवश्यक वस्तूंची दुकानं 21 दिवस चालू राहणार असल्याचा पुनरूच्चार प्रकाश जावडेकर यांनी केला.
Essential commodities, medicines, groceries etc will be available across the country, there is absolutely no need to panic: Union Minister @PrakashJavdekar #CabinetDecision #IndiaFightsCorona pic.twitter.com/4TbCxdXnV2
— PIB India (@PIB_India) March 25, 2020
(हे वाचा- भारतात लॉकडाऊन!बिग बास्केट-ग्रोफर्सने केलं दुकान बंद,अॅमेझॉनही घेणार नाही ऑर्डर ) सरकार पीडीएस पद्धती अंतर्गत देशातील 5 लाख रेशन दुकानांवर लाभार्थींना 5 किलो सब्सिडाइज्ड धान्य प्रत्येक महिन्याला देते. त्याऐवजी आता 7 किलो धान्य देण्यात येणार आहे.

)







