Home /News /money /

Jio-Facbook करारानंतर मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जॅक मा यांना टाकलं मागे

Jio-Facbook करारानंतर मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जॅक मा यांना टाकलं मागे

फेसबुकने रिलायन्स जिओसोबत केलेल्या करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : फेसबुकने रिलायन्स जिओसोबत केलेल्या करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आतापर्यंत जॅक मा हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते मात्र मुकेश अंबानी यांनी जॅक मा यांना मागे टाकलं आहे. 2014 मध्ये व्हॉटसअॅप विकत घेतल्यानंतर फेसबुक जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी झाली आहे. जिओ आणि फेसबुकच्या डीलनंतर बुधवारी शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 9.83 टक्क्यांनी वाढ होऊन 1359 रुपयांवर बंद झाले. फेसबुकसोबतच्या करारातून अंबानी यांची संपत्ती 4 अब्ज डॉलरनी वाढून ती 49 अब्ज डॉलर झाली. या करारासह मुकेश अंबानी यांची संपत्ती अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्यापेक्षा 3 अब्ज डॉलरने जास्त झाली. ब्लूमबर्हच्या आकडेवारीनुसार मंगळवारी 21 एप्रिलपर्यंत मुकेश अंबानी यांची संपत्ती 14 अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली होती. तर मंगळवारी जॅक मा यांची संपत्तीत एक डॉलर घट झाली. फेसबुक ने रिलायन्स जिओमध्ये 43 हाजर 574 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक 9.99 टक्के भागिदारी खरेदी करणार आहे. कंपनीमध्ये आतापर्यंत कोणत्याही परदेशी गुंतवणूक दाराने केलेली ही मोठी गुंतवणूक असेल. फेसबुकनंतर जिओ प्लॅटफॉर्मची किंमत जवळपास 4.75 लाख कोटी इतकी होईल. हे वाचा : Jio मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी 2016 मध्ये रिलायन्स कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात जिओ आणलं. जिओनं 4 वर्षांमध्ये प्रतिस्पर्धांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलान्सने टेलिकॉम ते होम ब्रॉडबॅण्डपर्यंत आपल्या सेवा विस्तारीत केल्या आहेत. भारतात फेसबुक आणि मेसेज अॅप आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉटसअॅपचं मोठं मार्केट आहे. फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत. 2020 मध्ये इंटरनेट यूझर्सची संख्या दुप्पट होण्याची अशा आहे. हे वाचा : Jio आणि Facebook भारतातील लोकांना व्यवसायाच्या नव्या संधी देणार : मार्क झुकरबर्ग संकलन, संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance

    पुढील बातम्या