Home /News /money /

Coronavirus च्या संकटामुळे अर्थमंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा; करदात्यांना दिलासा

Coronavirus च्या संकटामुळे अर्थमंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा; करदात्यांना दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Coronavirus च्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 मार्च : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Coronavirus च्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूरही या वेळी उपस्थित होते. संकटाच्या वेळी आर्थिक अडचण उद्भवू नयेत यासाठी घोषणा करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इन्कम टॅक्स भरायची शेवटची मुदत 30 जून 2020 असेल. उशीरा कर भरणाऱ्यांना दंड म्हणून घेतलं जाणारं व्याज 12 ऐवजी 9 टक्क्यांनी घेतलं जाईल. TDS भरणाऱ्यांना एक्सेंन्शन देण्यात आलेलं नाही. पण उशीरा TDS भरणाऱ्यांना 9 टक्के इंटरेस्ट भरावा लागेल.यापूर्वी हा दर 18 टक्के होता. GST भरणाऱ्यांसाठीसुद्धा मुदत वाढवण्यात आली आहे. उशीरा भरणाऱ्यांना दंड केला जाणार नाही. पण 30 जूननंतर GST फाइल करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल. या दंडाची रक्कमसुद्धा कमी करण्यात आली आहे. 9 टक्के दरानेच आता दंड घेतला जाईल. या आहेत महत्त्वपूर्ण घोषणा - इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली - उशीरा टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांना दंड कमी - टॅक्स भरण्याची मुदत 30 मार्चवरून 30 जूनपर्यंत - GST साठी मुदत वाढवली. आता 30 जूनपर्यंत भरता येणार हा कर. - पुढचे तीन महिने ATM मधून कॅश काढायला कुठलीही फी नाही - आर्थिक मदतीसाठी पॅकेज लवकरच जाहीर करणा - कंपन्यांसाठी इतर आर्थिक मदतही जाहीर करणार. - अनेक लोक घरून काम करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट टळेपर्यंत कायद्यानुसार कुठलीही लेट फी, दंड आणि व्याज आकारण्यात येणार नाही. अन्य बातम्या जग 2008-09 पेक्षाही भयावह मंदीच्या खायीत लोटलं जाणार, IMFच्या संचालकांचा इशारा कोरोनामुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या