गरिबांसाठी खाजगी रुग्णालयात कोरोनाची मोफत तपासणी, मोदी सरकार राबवणार विशेष योजना

गरिबांसाठी खाजगी रुग्णालयात कोरोनाची मोफत तपासणी, मोदी सरकार राबवणार विशेष योजना

कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात फैलावू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च : कोरोनाला हरवण्यासाठी सरकारकजडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात फैलावू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाने आयुष्मान योजनेअंतर्गत कोरोना व्हायरसवरील उपचार समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून गरिबातील गरिब व्यक्ती सुद्धा खाजगी रुग्णालयांमध्ये याचा उपचार घेऊ शकतो.

(हे वाचा-जग 2008-09 पेक्षाही भयावह मंदीच्या खायीत लोटलं जाणार, IMFच्या संचालकांचा इशारा)

आयुष्मान योजना मोदी सरकारच्या आरोग्यासंदर्भातील योजनांपैकी महत्त्वाची योजना आहे. NHA ने निर्णय घेतला आहे की, आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी या योजनेमध्ये येणाऱ्या खाजगी रुग्णालयांमध्ये जाऊन COVID-19 ची तपासणी करू शकतात.

(हे वाचा- कोरोनामुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता)

जर कोरोना व्हायरसची लक्षण दिसून आली आणि संबधित व्यक्तीला आयसोलेशन सुविधा असणाऱ्या खाजगी रुग्णालयामध्ये भरती व्हावं लागलं तर याचा खर्चही या योजनेस सामाविष्ट करण्यात आला आहे.

कोणता खर्च या योजनेअंतर्गत सामाविष्ट आहे?

NHA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ET ला दिलेल्या माहितीमध्ये हे स्पष्ट होत आहे की, या योजनेअंतर्गत कोरोनाच्या तपासणीशिवाय जर तुम्हाला विलगीकरणासाठी खाजगी रुग्णालयात राहावं लागलं तर त्याचा खर्चही या योजनेअंतर्गत सामाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे व्हायरस इन्फेक्शनच्या पॅकेज अंतर्गत उपचारासाठी लागणारा खर्चही कव्हर करण्याचा NHA विचार आहे.

(हे वाचा-कोरोनाचा सामना करण्यासाठी सरसावले मदतीचे हात! 100 कोटींची मदत करणार हे उद्योगपती)

दरम्यान NHA ने निती आयोगाकडून 2 दिवसांच्या आतमध्ये या प्रस्तावास मंजूरी मागितली आहे. येणाऱ्या आठवड्यापासून ही योजना लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने कोरोना व्हायरस तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचण्याची भीती व्यक्त केली आहे. जरी आरोग्य मंत्रालयाने ही भीती नाकारली असली, तरीही याबाबत सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत

First published: March 24, 2020, 2:54 PM IST

ताज्या बातम्या