'तुमच्या फोनमध्ये आलेला OTP सांगाल का?' असे कुणी विचारल्यास राहा सतर्क, रिकामे होऊ शकते बँक खाते

'तुमच्या फोनमध्ये आलेला OTP सांगाल का?' असे कुणी विचारल्यास राहा सतर्क, रिकामे होऊ शकते बँक खाते

कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या या संकटकाळात सायबर क्राइम मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नवीन पद्धती वापरून काही भामटे सामान्य माणसांना लाखोंचा गंडा घालत आहेत. अशावेळी सतर्क राहण्याचा इशारा विविध बँकांनी ग्राहकांना दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै : कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या या संकटकाळात सायबर क्राइम मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नवीन पद्धती वापरून काही भामटे सामान्य माणसांना लाखोंचा गंडा घालत आहेत. याकरता विविध बँका त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत. देशातील महत्त्वाची बँक असणाऱ्या आयडीबीआय (IDBI) बँकेने देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. बँकेने #ThreeLetterHorrorStory हा हॅशटॅग वापरून काही ट्वीट केले आहेत. कुणीही फोनवर ओटीपी मागितल्यास तो देऊ नका, त्याचप्रमाणे तुमचा एटीएम पिन देखील कोणाला शेअर करू नका असे ट्वीट बँकेने केले आहे.

सध्याच्या काळात अशी प्रकरणं वाढली आहेत की, हे भामटे आरबीआयचे किंवा कोणत्याही बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत ग्राहकांना फोन करतात आणि ओटीपी किंवा पिन मागतात. यामुळे देशामध्ये अनेकजण फसवले गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

(हे वाचा-सोने महागले तर चांदीची झळाळी उतरली, वाचा आठवड्याच्या शेवटी काय आहेत नवे दर)

ओटीपी मिळाल्यानंतर मॅलवेअरचा वापर करून ग्राहकांच्या बँकेचे डिटेल्स मिळवले जातात. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यातील पैसे हॅकर्सच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. अशाप्रकारे फसवणुकीपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी सावधान राहण्याचा इशारा आयडीबीआय बँकेकडून देण्यात आला आहे. देशातील इतर बँका देखील त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सतर्क करत आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 11, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading