• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! FPO अंतर्गत मिळणार 15 लाख रुपये, सरकारकडून गाइडलाइन जारी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! FPO अंतर्गत मिळणार 15 लाख रुपये, सरकारकडून गाइडलाइन जारी

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद सिंह तोमर यांनी 10 हजार FPO अर्थात शेतकरी उत्पादक संघटनेच्या (FPO- Farmer Producer Organizations) संवंर्धनासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 जुलै : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद सिंह तोमर (Agriculture Minister of India Narendra Singh Tomar) यांनी 10 हजार FPO अर्थात शेतकरी उत्पादक संघटनेच्या (FPO- Farmer Producer Organizations)  स्थापना आणि संवंर्धनासाठी दिशानिर्गेश जारी केले आहेत. त्यांनी अशी माहिती दिली की, वर्ष 2023-24 पर्यंत एकूण 10,000 एफपीओंची स्थापना करण्यात येईल. 5 वर्षांसाठी प्रत्येक एफपीओला मदत दिली जाईल. सरकार याकरता एकूण 6,866 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यांनी राज्यांना देखील आश्वासन दिले आहे की, आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे. जेणेकरून एफपीओंना प्रोत्साहन मिळेल. त्याचप्रमाणे यातून केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारे कर्ज देखील वाढवता येईल. (हे वाचा-'फोनमध्ये आलेला OTP सांगाल का?' सतर्क न राहिल्यास खाते कामे होण्याची शक्यता) या बैठकीमध्ये कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी अशी माहिती दिली की, देशात 90 हजारांपेक्षा जास्त सहकारी समिती आहेत, ज्यांच्यापैकी 60 हजारांकडे  जमीन देखील आहे आणि ते सक्षम देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून एफपीओंची स्थापना करून ग्रामीण भागात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. सामान्य शेतकऱ्यांचा थेट फायदा एफपीओ म्हणजे लघू आणि सीमांत शेतकऱ्यांचा एक समुह असेल, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनासाठी बाजार मिळेल, त्याचप्रमाणे खत, बियाणे, औषधे आणि कृषि उपकरणे खरेदी करणे देखील सोपे होईल. विविध सेवा स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि दलालांची मक्तेदारी देखील कमी होईल. FPO मुळे शेतकऱ्यांना त्याच्या पीकासाठी योग्य भाव मिळेल. (हे वाचा- सोने महागले तर चांदीची झळाळी उतरली, वाचा आठवड्याच्या शेवटी काय आहेत नवे दर) कृषीमंत्र्याच्या मते 2023-24 पर्यंत 10000 नवीन एफपीओ बनवले जातील. शेतकऱ्यांची सामुहिक शक्ती वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कसे मिळतील 15 लाख रुपये? राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे संस्थापक विनोद आनंद यांनी दिेलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एफफीओ बनवण्यासाठी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ वायके अलघ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. कमीत कमी 11 शेतकरी एकत्रित येऊन त्यांची कृषी संघटना बनवू शकतात. मोदी सरकारकडून जे 15 लाख रुपये देण्याचे सांगण्यात येत आहे, ते कंपनीचे काम बघून 3 वर्षात देण्यात येतील. FPO म्हणजे काय? FPO म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना एक शेतकऱ्यांचा समूह असतो. जो कृषी उत्पादनासाठी काम करतो. तसंच शेती संबंधित व्यावसायिक व्यवहार देखील या समुहाकडून पाहिले जातात. एक समूह बनवून तु्म्ही तुमचा एफपीओ कंपनी अॅक्टमध्ये रजिस्टर करू शकता. (हे वाचा-वॉरन बफेंना सोडलं मागे; मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 7 व्या क्रमांकाव) FPO ची स्थापना आणि संवर्धन करण्यासाठी सर्व छोट्या शेतकऱ्यांचे कृषी व्यापार संघ आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक काम करत आहेत. दोन्ही संस्थामध्ये मिळून आतापर्यंत 5 हजार एफपीओ रजिस्टर्ड आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: