PMC बँकेच्या खातेधारकांना दिलासा,आता काढू शकणार एवढे पैसे

PMC बँकेच्या खातेधारकांना दिलासा,आता काढू शकणार एवढे पैसे

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC बँकेच्या खातेधारकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. खातेधारकांना त्यांच्या खात्यातून फक्त 1 हजार रुपये काढण्याची परवानगी होती. आता मात्र ते 10 हजार रुपये काढू शकतात.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC बँकेच्या खातेधारकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. याआधी या बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध आणले होते. या बँकेच्या खातेधारकांची खाती गोठवण्यात आली होती.खातेधारकांना त्यांच्या खात्यातून फक्त 1 हजार रुपये काढण्याची परवानगी होती. आता मात्र ते 10 हजार रुपये काढू शकतात. बँकेच्या ज्या खातेदाराने कर्ज घेतलेलं नसेल तो खातेदार हे पैसे काढू शकतो.बँकेचे खातेधारक आणि ठेवीदारांचे हाल झाल्यामुळे हा दिलासा देण्यात आलाय.

बँकेच्या 135 शाखा

PMC बँकेमध्ये आर्थिक अनियमतता आढळल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली होती. या बँकेच्या राज्यात 135 शाखा आहेत. RBI या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. PMC बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखांमध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत.

RBI च्या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाहीत. तसंच नव्या ठेवीही स्वीकारता येणार नाहीत.

(हेही वाचा : पत्नीने सोशल मीडियावर केले गंभीर आरोप, भाजपचे मंत्री घटस्फोटासाठी गेले कोर्टात)

RBIने घातलेल्या निर्बंधानंतर बँकेचे संचालक जॉय थॉमस यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. बँकेवर आलेल्या संकटातून नक्कीच बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या काळात बँकेच्या ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल थॉमस यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि सर्वांना सहकार्य करण्याची विनंती केली.

=========================================================================================

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading