पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचा सिलसिला सुरूच, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

Petrol, Diesel - पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 12:38 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचा सिलसिला सुरूच, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

मुंबई, 27 सप्टेंबर : पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढण्याचा सिलसिला सुरूच आहे. आज तेलाचे दर वाढलेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता इथे पेट्रोल 15 पैसे प्रति लीटर महाग झालंय. तर चेन्नईत पेट्रोल 16 पैसे प्रति लीटर महाग झालंय. डिझेल दिल्ली आणि कोलकाता इथे 10 पैसे महाग झालंय आणि मुंबई, चेन्नई इथे 11पैसे वढलंय. काल (27सप्टेंबर) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाला नव्हता. 2 दिवसांत दिल्लीत पेट्रोल 21 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 17 पैसे प्रति लीटर महाग झालंय.

चार महानगरांमधल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज ( 28 सप्टेंबर ) दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर वाढलेत. ते क्रमश: 74.34 रुपये, 80 रुपये, 77.03 रुपये आणि 77.28 रुपये प्रति लीटर झालेत. तर डिझेलचे दर क्रमश: 67.24रुपये, 70.55 रुपये, 69.66 रुपये आणि 71.09 रुपये प्रति लीटर झालेत.

खूशखबर! 3 दिवसांनी कमी झाले सोन्या-चांदीचे दर, 'या' आहेत गुरुवारच्या किमती

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

Loading...

HDFC बँकेनं लाँच केलं नवं कार्ड, मिळतील 'हे' फायदे

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

बँकेतले पैसे सुरक्षित ठेवायचेत? मग SBI चा हा सल्ला मानाच

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Sep 27, 2019 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...