मुंबई : ‘पर्मनन्ट अकाउंट नंबर’ अर्थात ‘पॅन’ कार्ड हे आयकर विभागानं व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना जारी केलेलं एक युनिक दहा-अंकी अल्फान्यूमरिक आयडेंटिफायर आहे. पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरलं जातं आणि बँक अकाउंट उघडणं, कर्जासाठी अर्ज करणं, आयकर रिटर्न भरणं, गुंतवणूक करणं यासह विविध आर्थिक व्यवहारांसाठीसुद्धा ते आवश्यक असतं. पॅन कार्डमध्ये धारकाचे नाव, फोटो, जन्मतारीख आणि पॅन क्रमांक ही माहिती असते. पॅन क्रमांक प्रत्येक कार्डधारकासाठी युनिक असतो, आणि सर्व आर्थिक व्यवहारांसाठी संदर्भ क्रमांक म्हणून तो वापरला जातो. भारतामध्ये टॅक्सेबल इन्कम मिळवणाऱ्या प्रत्येकासाठी पॅन कार्ड हा एक आवश्यक दस्तऐवज आहे. हे कार्ड जर त्याच्याकडे नसेल, तर संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते. एक व्यक्ती एक पॅन कार्ड आयकर विभागानं ठरवून दिलेल्या नियमानुसार, एका व्यक्तीला स्वतःच्या नावाने एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगण्यास किंवा ठेवण्यास मनाई आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावावर जारी केलेलं फक्त एक पॅन कार्ड वापरण्याची परवानगी आहे. हे पॅन कार्ड प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक असतं, व ते दुसऱ्या कोणालाही हस्तांतरित केलं जाऊ शकत नाही.
7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! पगारात मिळणार आता इतकी वाढएखाद्या व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याच्याकडून दंडही आकारला जाऊ शकतो. कारण ते आयकर कायद्याचं उल्लंघन मानलं जातं. यामुळे आयकर नोंदींमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. आयकर अधिकाऱ्यांना एखाद्या व्यक्तीकडून भरण्यात येणारा टॅक्स आणि फायलिंगचा अचूक मागोवा घेणं कठीण होतं.
एकापेक्षा जास्त पॅनकार्डसाठी दंड एखाद्या व्यक्तीकडे स्वतःच्या नावे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्याचे आढळल्यास, आयकर विभाग आयकर कायदा 1961 च्या कलम 272बी अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई करू शकतो. या कलमानुसार, एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास संबंधित व्यक्तीला 10,000 रुपये दंड केला जातो. त्यामुळेच, प्रत्येकाने खात्री केली पाहिजे की, त्यांच्याकडे फक्त एक पॅन कार्ड असेल. तसंच त्यांच्याकडे स्वतःच्या नावाचे अतिरिक्त पॅन कार्ड असेल, तर ते तत्काळ आयकर विभागात जमा करावं.
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, पाहा किती स्वस्त झालं सोनं!आधार कार्डशी लिंक करा पॅन कार्ड अर्थ कायदा 2017 नुसार आयकर कायदा 1961 मध्ये एक नवीन कलम 139एए समाविष्ट केलं आहे, ज्यामध्ये आधार कार्ड मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं पॅनसाठी अर्ज करताना किंवा 1 जुलै 2017 पासून टॅक्स रिटर्न सादर करताना त्याचा/तिचा आधार क्रमांक देणं आवश्यक आहे. तुम्ही अजून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसल्यास, तुम्हाला ते 30 जून 2023 पर्यंत लिंक करणं आवश्यक आहे. अन्यथा, तुम्ही 1 जुलै 2023 पासून या कार्डचा वापरू शकणार नाही. पॅन कार्डधारकांनी आधार लिंक करण्याची 30 जून 2023 ही अंतिम मुदत चुकल्यानंतर, त्यांचा 10-अंकी युनिक अल्फान्यूमरिक क्रमांक निष्क्रिय होईल. दरम्यान, आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत शुल्क 500 रुपये होतं. त्यानंतर ते 1 जुलै 2022 ते 30 जून 2023 पर्यंत 1000 रुपये करण्यात आलं आहे. हे शुल्क ई-फायलिंग पोर्टलवर आधार-पॅन लिंकेज रिक्वेस्ट सबमिट करण्यापूर्वी लागू होईल.