मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता वाढ होणार आहे. DA वाढणार असून तुमचा पगार वाढणार आहे. सरकारने अलीकडेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए/डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली. सरकार या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी DA चार टक्क्यांनी वाढवू शकतो. सरकारने जानेवारी ते जुलै 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी डीए आणि डीआरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. जुलैमध्ये सरकार डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करु शकतं, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. चार टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल.
कोणत्या आधारावर निश्चित होतो DA? अखिल भारतीय CPI-IW च्या आकडेवारीनुसार कामगार ब्युरो, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा एक भाग, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करतो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्या 42 टक्के दराने डीए मिळत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे महागाई भत्ता मिळतो. त्याची गणना 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स वापरून केली जाते. हा आठवडा सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्यांसाठी मोठी संधी; महत्त्वाच्या 5 विभागात भरती सुरू केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 46 टक्के झाला तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. 42 टक्के बघितले तर DA 7560 रुपये होतो. दुसरीकडे, जर डीए दुसऱ्या सहामाहीत 46 टक्क्यांपर्यंत वाढला तर तो 8,280 रुपये होईल. सोप्या भाषेत पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे.
CRPF Recruitment: 10वी उत्तीर्णांनो, सरकारी जॉबचा लास्ट चान्स सोडू नका; CRPF मध्ये अर्जाची आजची शेवटची तारीखसरकारने 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे यंदाही एवढी वाढ अपेक्षित आहे. याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.