मुंबई, 6 नोव्हेंबर : ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीजने असे 3 समभाग सुचवले आहेत ज्यात मजबूत रिटर्न मिळण्याची क्षमता आहे. यामध्ये RSWM Limided, Sterling and Wilson Solar Ltd, Tata Steel शेअर्सचा समावेश आहे.
RSWM Limited
Rajasthan Spinning & Weaving Mills (RSWM) Ltd ही भारतातील एक प्रमुख सूत उत्पादक कंपनी आहे. IIFL सिक्युरिटीजने स्टॉकला BUY रेटिंग दिले आहे आणि 700 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी कॉल आहे. IIFL Securities ला या शेअरवर सुमारे 375-391 रुपयांचा खरेदी कॉल दिला आहे. सध्या हा शेअर 483-490 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. या शेअरची किंमत 700 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.
Mukesh Ambani यांचा आलिशान महल, कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक होण्याचं वृत्तावर रिलायन्सचं स्पष्टीकरण
Sterling and Wilson Solar Ltd
पॉवर, सोलार एनर्जी, वीज, विविध डेटा सेंटर्समध्ये डिझेल जनरेटर बनवणाऱ्या कंपन्या, कोजेन प्लांट आणि मोठ्या इमारतींसाठी MEP आणि EPC पुरवण्याचं काम ही कंपनी करते. IIFL सिक्युरिटीजने या स्टॉकला 750 च्या टार्गेट प्राईजसह BUY रेटिंग दिले आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजला 400-422 रुपयांच्या रेंजवर स्टॉकची खरेदीची शिफारस केली आहे. सध्या स्टॉक 450 रुपयांच्या आसपास दिसत आहे.
Terrible Accident! पहाटे पहाटे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात
TATA Steel
टाटा स्टील ही भारतातील प्रसिद्ध पोलाद उत्पादक कंपनी आहे. IIFL सिक्युरिटीजने 1897 च्या टार्गेट प्राईजसह खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या स्टॉकमध्ये येथून 48 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. ब्रोकरेज हाऊसने या शेअरला 1260-1310 रुपयांच्या आसपास खरेदीचा सल्ला दिला होता. सध्या स्टॉक 1325 रुपयांच्या आसपास दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market