मराठी बातम्या /बातम्या /देश /एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात, धुक्यामुळे आदळल्या एकमेकांना; 12 जण जखमी

एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात, धुक्यामुळे आदळल्या एकमेकांना; 12 जण जखमी

एका भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. या अपघातात 30 गाड्या एकमेकांना आदळल्या आहेत.

एका भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. या अपघातात 30 गाड्या एकमेकांना आदळल्या आहेत.

एका भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. या अपघातात 30 गाड्या एकमेकांना आदळल्या आहेत.

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: एका भीषण (Terrible accident) अपघाताची बातमी समोर येत आहे. एक्स्प्रेस वेवर धुक्याने कहर करायला सुरुवात केली आहे. गाझियाबादच्या ठाणे मसुरी भागात मेरठ एक्स्प्रेस वेवर (Meerut Expressway) धुक्यामुळे सुमारे 30 वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी (No casualties) झालेली नाही. धुक्यामुळे झालेल्या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर बराच वेळ वाहतूक कोंडी (traffic jam) झालेली पाहायला मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या धडकेत सुमारे 12 जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच दरम्यान पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने एक्स्प्रेस वेवरून हटवून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 30 वाहने एकमेकांवर आदळली.

हेही वाचा-  समोर बिबट्या दिसताच कुत्र्याला आला हृदयविकाराचा झटका; तडफडून मृत्यू, मन हेलावणारा VIDEO

 घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्व अपघात झालेली वाहनं एका बाजूला हटवून वाहतूक सुरू केली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे डझनभर लोक जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

धुक्यात वाढ

प्रदूषणात वाढ झाल्यामुळे दिवाळीच्या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्यातही वाढ झाली आहे. अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक 1000 च्या जवळ पोहोचला आहे. दिल्लीपासून गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडापर्यंत बहुतेक ठिकाणी AQI पातळी 999 आहे. प्रदूषणाची पातळी वाढल्याने शहर धुरकट झाले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना त्रास होत आहे.

First published:

Tags: Delhi News, Major accident