Home /News /money /

मुंबईत घर खरेदी करण्याचं स्वप्न 8 जुलैला करता येईल पूर्ण, राज्यातील या शहरात स्वस्तात खरेदी करा प्रॉपर्टी

मुंबईत घर खरेदी करण्याचं स्वप्न 8 जुलैला करता येईल पूर्ण, राज्यातील या शहरात स्वस्तात खरेदी करा प्रॉपर्टी

तुम्ही जर मुंबईसारख्या मोठ्या शहरात घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर लवकरच ते पूर्ण होऊ शकते. 8 जुलै रोजी तुम्ही ऑनलाइन बोली लावून या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकू शकता

    नवी दिल्ली, 04 जुलै: तुम्ही दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरात घर घेण्याचा (Own flat or property) विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. विमानकंपनी एअर इंडिया (Air India) आता देशभरात त्यांच्या विविध प्रॉपर्टीजना विकण्याची योजना आखत आहे. यामध्ये फ्लॅट आणि अन्य काही कमर्शिअर मालमत्तेचाही (residential, commercial and plots) समावेश आहे. या माध्यमातून 250-300 कोटी जमा करण्याचा एअर इंडियाचा मानस आहे. देशातील मोठ्या 10 शहरांमध्ये ही प्रॉपर्टी आहे. कंपनीकडून याकरता ई-लिलावाचे (Online auction)आयोजन करण्यात येणार आहे. हा लिलाव 8 जुलै, 2021 रोजी सुरू होणार असून 9 जुलै रोजी संपेल. 13.3 लाख रुपये असेल सुरुवातीची बोली मनीकंट्रोलमधील वृत्तानुसार, या यूनिट्सची सुरुवातीची बोली 13.3 लाख रुपये असेल. ग्राहकांना जवळपास 150 कोटी रुपयांपर्यंत बोली लावता येणार आहे. या लिलावामध्ये अशाही काही संपत्ती आहेत ज्या आधीही अनेकदा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. हे वाचा-सामान्यांना झटका! आजही महागलं इंधन, पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर या शहरातील मालमत्तेचा होणार लिलाव एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईमध्ये एक रहिवासी प्लॉट आणि फ्लॅट, नवी दिल्लीमध्ये पाच फ्लॅट, बंगळुरुमध्ये एक रहिवासी प्लॉट आणि कोलकातामध्ये चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्ता विकणार आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये एक बुकिंग कार्यालय आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमध्ये सहा फ्लॅट, नागपूरमध्ये बुकिंग ऑफिस, भुजमध्ये एअरलाइनचं हाउस आणि एक रहिवासी फ्लॅट तर तिरुवनंतपुरममध्ये एक रहिवाशी फ्लॅट आणि मंगळुरुमध्ये दोन फ्लॅट आहेत. हे वाचा-केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, DA सह सरकारने केल्या आहेत या 5 घोषणा 10 टक्क्यांपर्यंत मिळेल सूट एअर इंडियाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यापैकी काही संपत्ती, विशेषत: टिअर 1 शहरातील आरक्षित मुल्य कमी केलं आहे. अर्थात टिअर 1 शहरात ही एअरलाइन कंपनी संपत्ती खरेदी करण्यावर विशेष सवलत देत आहे. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, या संपत्तींमध्ये जवळपास 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Home Loan, Investment, Money

    पुढील बातम्या