Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: सामान्यांना झटका! आजही महागलं इंधन, रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

Petrol-Diesel Price Today: सामान्यांना झटका! आजही महागलं इंधन, रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

Petrol-Diesel Price Today on 4 July 2021: पेट्रोल-डिझेलच्या किंमतींच्या बाबतीत सामान्यांना दिलासा मिळतच नाही आहे. आजही तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवले आहेत.

    नवी दिल्ली, 04 जुलै: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज (Petrol-Diesel Price Today on 4th July 2021) पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आजही इंधनाच्या दरात वाढ केली आहे. सध्या देशभरातील विविध शहरात सोन्याच्या किंमती सर्वोच्च स्तरावर (Petrol-Diesel Rates at Record High) पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलमध्ये (Petrol Price in Mumbai) दर 105.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे (Diesel Price in Mumbai) दर 96.91 रुपये प्रति लीटर आहेत. तुमच्या शहरातील लेटेस्ट भाव देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. या 11 राज्यांच्या यादीमध्ये राजस्‍थान, बिहार, आंध्र प्रदेश, कनार्टक, तेलंगणा, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू आणि कश्‍मीर, ओडिशा, तमिळनाडू आणि लडाख आहे. देशभरात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये मिळत आहे. 4 जुलै 2021 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price on 4 July 2021) >> दिल्ली - पेट्रोल 99.51 रुपये आणि डिझेल 89.36 रुपये प्रति लीटर >> मुंबई - पेट्रोल 105.58 रुपये आणि डिझेल 96.91 रुपये प्रति लीटर >> चेन्नई - पेट्रोल 100.44 रुपये आणि डिझेल 93.91 रुपये प्रति लीटर >> कोलकाता - पेट्रोल 99.45 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रति लीटर हे वाचा-केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, DA सह सरकारने केल्या आहेत या 5 घोषणा >> जयपूर - पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 98.47 रुपये प्रति लीटर >> लखनऊ -पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लीटर >> पाटणा - पेट्रोल 101.62 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लीटर >> नोएडा - पेट्रोल 96.76 रुपये आणि डिझेल 89.83 रुपये प्रति लीटर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. हे वाचा-बँकेत FD करणाऱ्यांनी लक्ष द्या! RBI ने बदलला Fixed Deposit बाबतचा नियम असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise

    पुढील बातम्या