Home /News /money /

AMUL देत आहे 'आत्मनिर्भर' होण्याची उत्तम संधी, स्वत:च्या व्यवसायातून करा लाखोंची कमाई

AMUL देत आहे 'आत्मनिर्भर' होण्याची उत्तम संधी, स्वत:च्या व्यवसायातून करा लाखोंची कमाई

तुम्ही देखील तुमचा छोटेखानी व्यवसाय (New Business Idea)सुरू करून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर अमुलकडून (Amul) तुम्हाला एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.

    नवी दिल्ली, 10 मार्च: लॉकडाऊन काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. पण यानंतरची सकारात्मक बाब म्हणजे अनेकांनी स्वत:चा व्यवसायही सुरू केला. छोटेखानी व्यवसायात अनेक तरुणांनी पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही देखील अशाप्रकारे स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर अमुल (Amul) तुम्हाला एक चांगली संधी देत आहे. डेअरी प्रोडक्ट बनवणारी अमुल कंपनी देशातील एका प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. यावर्षी अमुल त्यांची फ्रेंचायझी ऑफर करत आहे. छोटी गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. यामध्ये नुकसान होण्याची शक्यताही अत्यल्प आहे. 2 लाखापासून सुरू करू शकता व्यवसाय अमुल कोणतीही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रेंचायझी ऑफर करत आहे. ही फ्रेंचायझी खरेदी करणे अधिक खर्चिक देखील नाही आहे. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. फ्रेंचायझीच्या माध्यमातून दर महिन्याला 5 ते 10 लाखांची देखील विक्री होऊ शकते. मात्र ही बाब तुमची फ्रेंचायझी कुठे आणि इतर काही फॅक्टर्सवर देखील निर्भर आहे. (हे वाचा-आता LPG गॅस सिलेंडरवर मिळवा 100 रुपयांपर्यंतची सूट, वाचा कसा मिळवाल फायदा) कशी घ्यावी लागेल फ्रेंचायझी? अमुलकडून दोन प्रकारे फ्रेंचायझी ऑफर केली जात आहे. एक म्हणजे अमुल आउटलेट, अमुल रेल्वे पार्लर किंवा अमुल क्योस्कची फ्रेंचायझी आणि दुसरी म्हणजे अमुल आईस्क्रीम, स्कुपिंग पार्लरची फ्रेंचायझी. जर तुम्ही पहिल्या फ्रेंचायझीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर 2 लाखांची गुंतवणूक आहे. दुसऱ्या प्रकारची फ्रेंचायझी घेऊ इच्छित असाल तर 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्योरिटीच्या स्वरुपात 25 ते 50 हजार रुपये द्यावे लागतील. किती मिळेल कमिशन? अमुल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमुल उत्पादनांच्या कमीतकमी विक्री किंमतीवर म्हणजेच एमआरपीवर कमिशन देते. दुधाच्या थैलीवर 2.5 टक्के, दुधाच्या उत्पादनांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमुल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी घेतल्यावर रेसिपी आधारित आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50% कमिशन मिळते. त्याचबरोबर, कंपनी प्री-पॅक केलेल्या आईस्क्रीमवर 20 टक्के आणि अमुल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन देते. (हे वाचा-उस्मानीला पुणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार, उच्च न्यायालयाचे निर्देश) एवढ्या जागेची आवश्यकता जर आपण अमुल आउटलेट घेणार असाल तर तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. तर अमुल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रेंचायझीसाठी किमान 300 चौरस फूट जागा असावी. कशाप्रकारे कराल अर्ज? जर तुम्ही फ्रेंचायझी घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला retail@amul.coop वर मेल करावा लागेल. याशिवाय तुम्ही http://amul.com/m/amul-scooping-parlours यावर देखील माहिती मिळवू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Business News, Career opportunities, Money, Small business

    पुढील बातम्या