मराठी बातम्या /बातम्या /मनी /Aadhaar Card असल्यास मोदी सरकार देतंय 1% व्याज दरानं कर्ज? इथे वाचा सविस्तर

Aadhaar Card असल्यास मोदी सरकार देतंय 1% व्याज दरानं कर्ज? इथे वाचा सविस्तर

सध्या ‘मोदी सरकार (Modi Government) तुम्हाला आधार कार्डद्वारे (Aadhaar Card) फक्त 1 टक्के व्याज दराने कर्ज देईल.’ असा दावा करणारा संदेश सगळीकडे व्हायरल झाला आहे.

सध्या ‘मोदी सरकार (Modi Government) तुम्हाला आधार कार्डद्वारे (Aadhaar Card) फक्त 1 टक्के व्याज दराने कर्ज देईल.’ असा दावा करणारा संदेश सगळीकडे व्हायरल झाला आहे.

सध्या ‘मोदी सरकार (Modi Government) तुम्हाला आधार कार्डद्वारे (Aadhaar Card) फक्त 1 टक्के व्याज दराने कर्ज देईल.’ असा दावा करणारा संदेश सगळीकडे व्हायरल झाला आहे.

    मुंबई, 03 ऑगस्ट: आजकाल सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक प्रकारच्या बातम्या, मेसेज वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरत असतात. जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील बातमीदेखील या माध्यमातून काही क्षणात सगळीकडे व्हायरल होते. अनेकदा अशा बातम्या, संदेश यांची शहानिशा केली जात नाही. ती खरी आहे की खोटी याबद्दल खातरजमा न करताच ती फॉरवर्ड केली जाते. त्यामुळे अनेक लोक याला बळी पडतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक होते. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी तो खरा आहे का याची खात्री करून घेणं महत्त्वाचं असतं.

    सध्या ‘मोदी सरकार (Modi Government) तुम्हाला आधार कार्डद्वारे (Aadhaar Card) फक्त 1 टक्के व्याज दराने कर्ज देईल.’ असा दावा करणारा संदेश सगळीकडे व्हायरल झाला आहे. तुम्ही फेसबुक, WhatsApp, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाल, तर कदाचित तुम्हालाही हा संदेश आला असेल. तसे असेल तर त्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. WhatsApp वर मोठ्या प्रमाणात शेअर झालेला हा संदेश बनावट असल्याचं पीआयबी म्हणजे प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोनं (PIB) स्पष्ट केलं आहे.

    पीआयबी (PIB) ही भारत सरकारची धोरणं, उपक्रम या विषयी वर्तमानपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माहिती देणारी प्रमुख संस्था आहे. या संस्थेनं ट्वीट करून हा संदेश खोटा असून, यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ‘प्रधानमंत्री योजना’ नावाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून कर्ज दिले जात नाही, असं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.

    ही सायबर गुन्हेगारांची (Cyber Criminals) एक चाल असून अशा संदेशाद्वारे ते लोकांना भुलवून त्यांची आर्थिक लुबाडणूक करतात. या संदेशावर विश्वास ठेवून कोणी आपली माहिती दिली तर त्यांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे येणारी कोणतीही बातमी, संदेश शंकास्पद वाटत असेल तर ती खरी आहे की खोटी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. याकरता पीआयबी मदतीसाठी सज्ज आहे.

    अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातमीबद्दल इथं तक्रार करता येईल

    सरकारशी संबंधित कोणत्याही बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची (PIB Fact Check) मदत घेतली जाऊ शकते. कुणीही व्यक्ती ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा व्हॉट्सअॅप आलेल्या अशा बातमीचा स्क्रीनशॉट काढून, किंवा त्या बातमीचे URL पीआयबी फॅक्ट चेकला 918799711259 वर पाठवू शकते किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकते. त्याची पूर्ण शहानिशा करून पीआयबी ती बातमी खरी आहे का खोटी हे जाहीर करेल. यामुळे अनेकांची फसवणूक टळेल. तेव्हा तुम्हालाही अशी एखादी बातमी, संदेश शंकास्पद वाटली तर ताबडतोब पीआयबी फॅक्ट चेकची मदत घ्या.

    First published: