Elec-widget

नोकरदारांना दिवाळीआधी PF मध्ये मिळणार 'इतका' फायदा

नोकरदारांना दिवाळीआधी PF मध्ये मिळणार 'इतका' फायदा

PF, EPFO, Jobs - नोकरदारांसाठी एक खूशखबर आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2018-19 साठी पीएफवर 8.65 टक्के व्याज मिळेल. याचा फायदा थेट 6 कोटी खातेधारकांना मिळणार. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार लवकरच नोकरदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होईल. याआधी 2017-18 या आर्थिक वर्षात व्याज दर 8.55 टक्के होता.

आता लवकरच ईपीएफओ खातेधारकांच्या अकाउंटमध्ये वाढलेले व्याज दर ट्रान्सफर करणार आहे. सरकारच्या इतर छोट्या बचत योजनांवरचे व्याज दर कमी आहेत. EPFO चे 6 कोटींहून जास्त सदस्य आहेत. EPFO 11 लाख करोडपेक्षा जास्त निवृत्ती सेव्हिंग मॅनेज करते.

खूशखबर! सोन्या-चांदीच्या किमती झाल्या कमी, 'हे' आहेत मंगळवारचे दर

EPF व्याजदरांवर एक नजर

आर्थिक वर्ष 2017-18मध्ये ईपीएफवर व्याज 8.55 टक्के होतं

Loading...

ईपीएफओनं 2016-17मध्ये ईपीएफवर व्याज दर कमी करून 8.63 टक्के केलं होतं

याआधी आर्थिक वर्ष 2015-16मध्ये व्याज दर 8.80 टक्के होतं.

... म्हणून सलग 4 दिवस आहेत बँका बंद

कर्मचारी भविष्य निधी संघटना ( EPFO ) लवकरच नोकरदारांसाठी खास भेट देणार आहे. लवकरच तुम्हाला तुमचा PF काढणं सोपं जाणार आहे. PF चं सेटलमेंट अवघ्या 3 दिवसांमध्ये होणार आहे. EPFO कमिशनर सुनील बर्थवाल यांच्या माहितीप्रमाणे, आता नव्या पद्धतीनं तुम्ही 3 दिवसांत PF काढू शकता. EPF नं ई इन्स्पेक्शन सुरू केलंय.

कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसच्या मदतीनं सेटलमेंट

सुनील बर्थवाल म्हणाले, काही बाबतीत आकड्यांच्या घोटाळ्यामुळे कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल नंबर जनरेट होत नाहीय. हे लक्षात घेता ईपीएफओ कर्मचारी डेटाबेसद्वारे पर्यायी व्यवस्थेचा विचार करतायत. ईपीएफओ असं ठरवतायत की KYC चा वापर करणाऱ्यांना तीन दिवसात PF चे पैसे मिळतील.

LIC मध्ये नोकरीची मोठी संधी, 8500 जागांवर होणार भरती

EPFO तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP पाठवेल. हा OTP एंटर करून क्लेम फाॅर्म सबमिट करावा लागेल. क्लेम प्रोसेस पूर्ण झाल्यावर रक्कम तुमच्या रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल.

VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Pf
First Published: Sep 17, 2019 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...