मुंबई, 14 जून : मायानगरी मुंबई महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण, 13 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याच्या घटनेनं मुंबई हादरून गेली आहे. कफ परेडमधील आंबेडकर नगरमधील ही घटना आहे. दरम्यान, या प्रकरणातील 3 आरोपी फरार झाले आहेत. नराधम पीडितेला जबरदस्तीनं एका खोलीत घेऊन गेले आणि त्यांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील नराधमांची ओळख पटली असून तीनही आरोपी फरार आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
खरंच मुंबई सुरक्षित?
यापूर्वी शक्ती मिलमध्ये देखील सामुहिक बलात्काराची घटना समोर आली होती. त्यानंतर महिल सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या होत्या. यापूर्वी देखील मुंबईत बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत.
भाजपच्या महिला कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, डोक्यावर गोळी झाडून घेतला जीव
राज्यात बलात्काराच्या वाढत्या घटना
राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी नागपूर, गुहागरमध्ये बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बलात्काऱ्यांना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.
आई-वडिल नसताना बलात्कार
यापूर्वी नागपूरमध्ये देखील आई-वडील कामावर गेले असताना घरी असलेल्या त्यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. 25 वर्षाच्या नराधमानं हा बलात्कार केला होता. नागपूरच्या वाडी भागात साडेतीन वर्षांची मुलगी घरी ठेवून दाम्पत्य कामावर गेलं होतं. आई-वडील कामावर गेले असल्याने साडेतीन वर्षाची लहानगी शेजारी असणाऱ्या लहान मुलांसोबत खेळण्यात दंग होती. त्यानंतर तिथं आलेल्या भूषण दहाट या आरोपीने त्या चिमुकलीला बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता.
मुंबईत उड्डाणपुलाखाली भीषण अग्नितांडव, गाड्या जळून खाक