जाहिरात
मराठी बातम्या / मनी / दरमहा होईल लाखोंची कमाई! नवीन वर्षात सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून मिळेल मदत

दरमहा होईल लाखोंची कमाई! नवीन वर्षात सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून मिळेल मदत

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

नवीन वर्षात नवीन व्यवसाय (Starting own business) सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही पेपर नॅपकिन (Paper Napkin Business) बिझनेसचा विचार करू शकता

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जानेवारी: नवीन वर्षात नवीन व्यवसाय (Starting own business) सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही पेपर नॅपकिन (Paper Napkin Business) बिझनेसचा विचार करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून देखील मदत मिळेल. पेपर नॅपकिन मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट सुरू करून तुम्ही दरमहा बंपर कमाई करू शकता. पेपर नॅपकिनचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू (Investment in Paper Napkin Manufacturing Unit) करण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता याबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये टिश्यू पेपर अर्थात नॅपकिनचा वापर वाढला आहे. साधारणपणे हात-तोंड पुसण्यासाठी टिश्यूचा वापर केला जातो. आता स्वयंपाकघरातही सर्रास टिश्यू पेपरचा वापर होताना दिसतो. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ढाबे, ऑफिस, हॉस्पिटल्स याठिकाणी देखील टिश्यीचा वापर वाढला आहे. अशावेळी हा टिश्यू पेपर बनवण्याचा व्यवसाय फायद्याचा ठरेल. हे वाचा- Income Tax : करदात्यांना मोठा दिलासा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही होणार सुनावणी किती कराल गुंतवणूक? जर तुम्ही टिश्यू पेपर किंवा पेपर नॅपकिन बनवण्याचे यूनिट सुरू करणार असाल तर तुम्हाला 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. एवढे पैसे असल्यास तुम्ही कोणत्याही बँखेच्या मुद्रा स्कीमअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता. 3.50 लाख रुपये तुमच्याकडे असल्याने बँकेकडून तुम्हाला टर्म लोन स्वरुपात 3.10 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 5.30 लाख रुपयांपर्यंत मिळेल. वर्षभरात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिनचे उत्पादन केले जाऊ शकते. हे पेपर नॅपकिन्स तुम्ही साधारण 65 रुपये प्रति किलोच्या दराने विकू शकता. अर्थात वर्षभरात तुम्हाला 97.50 लाख रुपयांचा टर्न ओव्हर शक्य आहे. तुम्ही संपूर्ण खर्च वजा केल्यास 10-12 लाख रुपयांची वार्षिक बचत होईल. हे वाचा- एलियनने अपहरण केल्यास मिळेल विमा संरक्षण; मिशी, वॅलेन्टाईन असे जगभरातील अजब विमा मुद्रा योजनेअंतर्गत करा अर्ज तुम्ही हा व्यवसाय करण्यास इच्छूक असाल तर पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत या व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला अर्जात नाव पत्ता, व्यवसायाच्या ठिकाणचा पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल. इथं तुम्हाला प्रोसेसिंग किंवा गॅरंटी फी द्यावी लागणार नाही. कर्ज तुम्ही हप्त्यांत फेडू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , new year
  • First Published :
जाहिरात
जाहिरात