मुंबई, 31 डिसेंबर : लोक आपलं घर आरोग्य किंवा त्यांची गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी विमा काढून ठेवतात. परंतु जगात इतरही अनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुमच्या अपहरणापासून ते तुमच्या हसण्यापर्यंत सुरक्षितता आहे. याबाबतचं वृत्त ‘झी बिझनेस’ने दिलं आहेत. अशा अजब विम्यांबद्दल माहिती घेऊयात. 1. एलियन्सनी अपहरण केल्यावर विमा लंडनमध्ये 30 हजारांहून अधिक लोकांनी एलियन अपहरण विमा घेतला आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरात एलियन्स असल्याचा पुरावा द्यावा लागेल. 2. शरीराच्या अवयवांचा विमा अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सने 30 दशलक्ष डॉलर्ससाठी तिच्या स्मितहास्याचा विमा उतरवला आहे. या प्रकारचा विमा खेळाडू आणि खेळाडूंसाठी उपयुक्त आहे. 3. टेस्ट बड्सचा विमा टेस्ट बड्सचा देखील विमा आहे. फूड्स रिव्ह्यूअर एगॉन रोने यांनी त्यांच्या टेस्ट बड्सचा 393,000 डॉलरचा विमा उतरवला आहे. 4. व्हॅलेंटाईन विमा जपानमध्ये व्हॅलेंटाईनचा विमा उतरवला जाऊ शकतो. ज्यामध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्हाला एकटे सोडले जाऊ नये याची काळजी घेतली जाते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमची नोंदणी करू शकता. त्यानंतर 14 फेब्रुवारीला तुम्हाला चॉकलेट्स आणि पर्सनल मेसेज मिळतात. 5. मिशांचा विमा तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मर्व्ह ह्यूजने त्याच्या मिशांचा 3,70,000 डॉलर्सचा विमा उतरवला आहे. 6. लग्नाचा विमा जर तुमचा विवाह कोणत्याही अपघातामुळे रद्द झाला असेल, तर तुम्हाला या विम्याअंतर्गत लग्नात झालेल्या खर्चासाठी संरक्षण मिळते. भारतातही लग्नाचा विमा काढता येतो. 7. अपहरण विमा तुमचे अपहरण झाल्यास अपहरणकर्त्याने जे पैसे मागितले आहेत ते तुमचे कुटुंब देऊ शकणार नाही अशी तुम्हाला भीती वाटत असल्यास अपहरणाचा विमा देखील उपलब्ध आहे. यासह, तुमचे इतर सर्व खर्च जसे की वैद्यकीय खर्च, प्रवास खर्च इत्यादी सर्व समाविष्ट आहेत. 8. पाळीव प्राणी विमा पाळीव प्राणी ठेवणे खूप सामान्य आहे. प्रत्येकजण आपल्या पाळीव प्राण्याला लहान मुलाप्रमाणे ठेवतो, म्हणून जर तुमचा पाळीव प्राणी आजारी पडला किंवा अपघात झाला तर, पाळीव प्राणी विमा तुम्हाला या खर्चासाठी संरक्षण देतो. जेव्हा महाग जातीचे प्राणी असतात तेव्हा ते अधिक उपयुक्त असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.