मराठी बातम्या /बातम्या /मनी /Income Tax : करदात्यांना मोठा दिलासा, आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही होणार सुनावणी

Income Tax : करदात्यांना मोठा दिलासा, आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही होणार सुनावणी

आतापर्यंत फेसलेस असेसमेंट स्कीमअंतर्गत टॅक्सपेयर्सना ई-मेलच्या (E-mail) माध्यमातून सर्व माहिती ऑनलाइन पाठवावी लागत होती.

आतापर्यंत फेसलेस असेसमेंट स्कीमअंतर्गत टॅक्सपेयर्सना ई-मेलच्या (E-mail) माध्यमातून सर्व माहिती ऑनलाइन पाठवावी लागत होती.

आतापर्यंत फेसलेस असेसमेंट स्कीमअंतर्गत टॅक्सपेयर्सना ई-मेलच्या (E-mail) माध्यमातून सर्व माहिती ऑनलाइन पाठवावी लागत होती.

  नवी दिल्ली, 31 डिसेंबर : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. या विभागाने फेसलेस असेसमेंटच्या (Faceless Assessment) प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. या बदलामुळे टॅक्सपेयर्ससाठी (Taxpayers) अपील (Appeal) आणि व्यक्तिगत सुनावणी अधिक सोपी बनली आहे. आता टॅक्स वसुली (Tax) किंवा नोटिशीच्या विरोधात अपील केल्यास त्यावरची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही होऊ शकणार आहे.

  आतापर्यंत फेसलेस असेसमेंट स्कीमअंतर्गत टॅक्सपेयर्सना ई-मेलच्या (E-mail) माध्यमातून सर्व माहिती ऑनलाइन पाठवावी लागत होती. त्याशिवाय आपली बाजू ऑफिसरसमोर मांडावी लागत होती. तसंच, त्यासाठी विशेष परवानगीही घ्यावी लागत होती. इन्कम टॅक्स विभागाचे मुख्य आयुक्त (Chief Commissioner) किंवा फेसलेस अपील सेंटरच्या महासंचालकांच्या (Director General) परवानगीनंतरच ते शक्य होत होतं. आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (Central Board of Direct Taxes) अर्थात सीबीडीटीने (CBDT) ही लांबलचक प्रक्रिया सोपी करण्याचं काम केलं आहे. परवानगी घेण्यासारख्या अडचणींपासून करदात्यांची सुटका केली आहेत.

  (घरच्यांकडून होता लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने रेल्वेखाली दिला जीव)

  सीबीडीटीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही नवी सुविधा टॅक्सपेयर्स अर्थात करदात्यांच्या मागणीच्या आधारे उपलब्ध केली जाणार आहे. याचाच अर्थ असा, की करदात्यांना वाटलं तर ते इन्कम टॅक्स ऑफिसरसमोर आपलं म्हणणं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारेही (Video Calling) मांडू शकतात. फेसलेस असेसमेंटची प्रक्रिया सोपी बनवल्यामुळे करदात्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

  सीबीडीटीने सप्टेंबर 2020मध्ये फेसलेस स्कीम सुरू केली होती. या स्कीमचा उद्देश असा आहे, की करदात्यांनी टॅक्स पेमेंट आणि रिटर्न ऑनलाइन (Online Return) भरावा.

  (...अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, काँग्रेस मंत्र्याने दिला स्पष्ट इशारा)

  सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न ( ITR return) भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली होती. नवीन आयकर पोर्टल आणि कोरोना विषाणूमुळे आलेल्या अडचणींमुळे केंद्र सरकारने मुदत वाढवली होती. लेट फी भरून आयटीआर फाइल (Income Tax Return Filing) करण्यासाठी 31 मार्च 2022 ही मुदत देण्यात आली आहे.

  कर्मचारीवर्गाला प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) द्यावाच लागतो; मात्र कर म्हणून दिलेल्या रक्कमेतील काही रक्कम तुम्ही परतही मिळवू शकता. यासाठी केवळ आयटीआर (ITR) म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न अर्ज दाखल करावा लागतो. कित्येक जण थोडीशीच रक्कम परत मिळणार आहे असा विचार करून आयटीआर फाईल करत नाहीत. किती तरी जणांना असं वाटतं की, आपल्या पगाराला टॅक्सच लागत नाही, तर आयटीआर का भरा? पण आयटीआर भरणं हे या दोन्ही वर्गातल्या व्यक्तींसाठी फायद्याचं (Benefits of ITR) असतं.

  First published:

  Tags: Income tax, New year