Home /News /money /

केवळ 25000 रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 50000 रुपयांपर्यंत कमाई

केवळ 25000 रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 50000 रुपयांपर्यंत कमाई

Start Your Own Business: तुम्ही देखील स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हा व्यवसाय तुम्हाला दरमहा 50000 रुपयांपर्यंत कमाई करून देण्यास मदत करेल

    मुंबई, 02 जानेवारी: तुम्हाला जर दरमहा 50 हजारांपर्यंत कमाई करायची असेल आणि त्याकरता एखाद्या बिझनेस आयडियाच्या (Small Business Idea) शोधात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला नफा (earn money) मिळवू शकता. हा व्यवसाय तुम्ही केवळ 25 हजार रुपये गुंतवून (Starting own business) सुरू करू शकता. यात तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांपर्यंत (Earn up-to 50000 rupees) पैसे कमावण्याची संधी आहे. हा व्यवसाय आहे कार वॉशिगचा (Car Washing Business). जाणून घ्या कशाप्रकारे सुरू कराल हा व्यवसाय? कशी कराल सुरुवात? कार वॉशिंगची व्यावसायिक मशिन्स खरतर एक लाख रुपयांपर्यंत येतात. परंतु, तुम्ही ज्याठिकाणी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात त्या जागेवर इतक्या गाड्या आहेत की नाही ज्याद्वारे हा खर्च निघेल, हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. हे वाचा-5.25 रुपयांच्या बँकिंग शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती! तुमच्याकडे आहे का हा शेअर? बेसिक व्यावसायिक मशिन्सची किंमत 12,000 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये जर तुम्हाला दोन हॉर्सपॉवरची मोटार घेतली तर त्यासाठी सुमारे 14 हजार रुपये खर्च येईल, ज्यामध्ये पाईपपासून नोझलपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय तुम्हाला 30 लीटरचा व्हॅक्यूम क्लीनर घ्यावा लागेल, ज्याची किंमत 9-10 हजार रुपयांपर्यंत आहे. वॉशिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी जसं की- शॅम्पू, ग्लोव्ह्ज, टायर पॉलिश आणि डॅशबोर्ड पॉलिशिंगचा पाच लीटरचा कॅन इ. 1700 रुपयांपर्यंत येतील. लक्षात ठेवा या गोष्टी कार वॉशिंग सेंटर उघडण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला एक चांगली जागा पाहावी लागेल जिथे एखादी सोसायटी किंवा कार संबंधित गोष्टींसाठी मार्केट आहे. कारण अशाठिकाणी वर्दळ जास्त असते. मात्र पार्किंगची जागा असेल किंवा वाहने सहज येऊ शकतील अशा ठिकाणी दुकान घ्या. याहीपेक्षा चांगला पर्याय म्हणजे तुम्ही मेकॅनिकच्या दुकानाचे अर्धे भाडे देऊन गाडी धुण्याचे काम सुरू करू शकता. यामुळे पैशांचीही बचत होईल आणि त्या भागात कसा प्रतिसाद मिळतो हेही बघता येईल. हे वाचा-कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार? कर्जानुसार काय आहेत नियम? कशाप्रकारे होईल कमाई? कार वॉशिंगसाठी आकारले जाणारे शुल्क संबंधित शहरावर आधारित असते. छोट्या शहरात ऑल्टो, वॅगनआर, क्वीड यासारख्या छोट्या गाड्यांच्या वॉशिंगसाठी 150 रुपये आकारले जातात. तर मोठ्या शहरात या गाड्यांसाठी 250 रुपयांपर्यंत पैसे आकारले जातात. यापेक्षा मोठ्या गाड्या जसं की- स्विफ्ट डिझायर, ह्युंदाई यासारख्या गाड्यांसाठी 350 रुपये तर एसयूव्ही कार्ससाठी 450 रुपये आकारले जातात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Business, Business News, Money, Small business

    पुढील बातम्या