मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' टेक्नॉलॉजीने व्हाल मालमाल! मातीचा वापर न करता घराच्या छतावर उभारा बाग

'या' टेक्नॉलॉजीने व्हाल मालमाल! मातीचा वापर न करता घराच्या छतावर उभारा बाग

फार्मिंग टिप्स

फार्मिंग टिप्स

तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर मायक्रोग्रीन फार्मिंग करून तुम्ही दरमहा एक लाख रुपये कमवू शकता. सध्या सेंद्रिय अन्नाची मागणी झपाट्याने वाढतेय. अशा परिस्थितीत तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी आहे. तुम्हाला या व्यवसायात खूप पैसे गुंतवण्याचीही गरज नाही.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 मार्च: तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आपण एक हटके आयडिया जाणून घेणार आहोत. आपण पाहतो की, बहुतेक लोक आपल्या घराच्या टेरेसचा वापर फक्त कपडे वगैरे सुकवण्यासाठी आणि अनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी करतात. पण तुमच्या घराच्या छतावर 500 ते 1000 स्क्वेअर फूट जागा असेल तर तुम्ही तिथे मायक्रोग्रीन फार्मिंग करू शकता. यासाठी छतावर मातीचा थर टाकण्याचीही गरज भासणार नाही. सध्याच्या काळात लोक आरोग्याबाबत खूप जागरूक झाल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी हे लोक ऑर्गेनिक फूडला जास्त पसंती देतात. मात्र हे फूड सहजासहजी कुठेही मिळत नाही. तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही कमी खर्चात दरमहा एक लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते अर्धवेळ किंवा पूर्णवेळ सुरू करू शकता.

'या' तंत्रज्ञानाने पालटले शेतकऱ्याचे नशीब! सहज मिळतोय 6 ते 7 लाखांचा नफा, नेमकं कोणतं तंत्रज्ञान?

टेरेसवर कशी करता येईल भाजीपाल्याची लागवड?

छतावर शेती करण्याच्या तंत्रज्ञानाला टेरेस फार्मिंग म्हटलं जातं. घराच्या छतावर माती न टाकताही तुम्ही सहज शेती करू शकता. यासाठी, टेबलच्या उंचीइतके कंटेनरमध्ये छोटे-छोटे क्यारिया तयार केले जातात. त्यामध्ये तुम्ही मायक्रोग्रीन फार्मिंग करू शकता. त्यात कोथिंबीर, कोबी, पालक, मुळा, वॉटरक्रेस, मटर, पत्ताकोबी यासह 40 प्रकारच्या भाज्यांचा समावेश आहे. याच्या बिया सामान्य भाज्यांपेक्षा वेगळ्या असून उत्पादनही लवकर होते. ते चटणी, लोणचे किंवा मसाल्यांसोबत न शिजवता देखील खाल्ले जाते.

एकेकाळी मसाल्यांच्या फॅक्ट्रीत केलं काम, कोरोनात नोकरी गमावताच पठ्ठ्याने उभारला स्वतःचा मसाला ब्रँड!

माइक्रोग्रीन फार्मिंगचे अनेक फायदे आहेत

जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीनुसार, मायक्रोग्रीनमध्ये सामान्य भाज्यांपेक्षा 40 टक्के अधिक पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. म्हणजेच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते 2 ते 4 आठवड्यांत तयार होतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याचा धोका कमी असतो. त्याच वेळी, जमिनीशी संपर्क नसल्यामुळे, कीटकांची शक्यता नसते.

सातत्याने वाढतेय मागणी

जगभरात मायक्रोग्रीनची मागणी झपाट्याने वाढतेय. दिवसेंदिवस लोक आरोग्याबाबत आणखीनच जागृक होत आहेत. यामुळे भविष्यात त्यांची मागणी आणखी वाढणार आहे. मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या हाय प्रोफाइल कुटुंबांमध्ये त्याची मागणी सर्वाधिक आहे. जेव्हा तुम्ही त्यांना बाजारात विकता तेव्हा तुम्हाला सामान्य भाज्यांपेक्षा जास्त भाव मिळतो. ग्रीन व्हेजिटेबल बॉक्स पॅकिंगच्या मदतीने तुम्ही त्यांना अधिक आकर्षक बनवू शकता. अशा प्रकारे, तुम्ही 1000 चौरस फुटांच्या छतावरून 1 लाखांपर्यंत कमवू शकता.

First published:

Tags: Organic farming