मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' तंत्रज्ञानाने पालटले शेतकऱ्याचे नशीब! सहज मिळतोय 6 ते 7 लाखांचा नफा, नेमकं कोणतं तंत्रज्ञान?

'या' तंत्रज्ञानाने पालटले शेतकऱ्याचे नशीब! सहज मिळतोय 6 ते 7 लाखांचा नफा, नेमकं कोणतं तंत्रज्ञान?

शेतीसाठी खास टिप्स

शेतीसाठी खास टिप्स

उद्यान विभागा अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना चालवली जाते. या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे प्रत्येक थेंबाचा उपयोग करणे हा आहे. ड्रिप सिंचाई योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान मिळते. पहिल्या एका एकरमध्ये ही यंत्रणा लावण्यास 90 हजार रुपये लागतात.

पुढे वाचा ...
  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India

बेगुसराय, नीरज कुमार : शेती करताना तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर शेती आणखी चांगल्या प्रकारे होऊ शकते. एवढेच नाही तर उत्पन्नही जास्त निघते आणि मेहनत देखील कमी लागते. शेतीत पाणी, पैसा आणि मेहनत कमी लागावी यासाठी ठिबक सिंचन योजना फायदेशीर ठरतेय. ठिबक सिंचनामुळे पिकांची उत्पादकता वाढून नुकसान कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी मान्य केलेय. त्याचबरोबर एका शेतात दोन ते तीन पिके लावता येतात. मात्र, यातील बहुतांश पिके पारंपरिक शेतीपासून वेगली घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. बेगुसराय येथील विनय हा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणारा जिल्ह्यातील पहिला शेतकरी ठरला आहे.

6 एकर शेतीतून 5 लाखांचे उत्पन्न मिळते

2014 पासून विनय ठिबक सिंचन पद्धतीने शेती करत आहेत. एवढेच नाही तर हा शेतकरी इतर शेतकऱ्यांना थेंब-थेंब सिंचन करण्यास प्रवृत्त देखील करताय. सिंचनाची ही पद्धत पाण्याची बचत करण्याबरोबरच पिकाची उत्पादकता वाढवण्यास उपयुक्त ठरत आहे. बेगुसराय जिल्ह्यातील मटिहानी गावचे विनय कुमार या शेतकऱ्याने प्रगत शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितले की, ठिबक सिंचनाने 70 टक्के पाण्याची बचत होते. एवढेच नाही तर उत्पादनात शंभरपट वाढ होते. 2014 पासून ते या ठिबक सिंचन पद्धतीने शेती करत आहेत. त्याचबरोबर या पद्धतीने 6 ते 7 एकर शेती करून 5 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. एकाच वेळी दोन ते तीन पिके एकाच शेतात लावली जातात.

अशी शेती करतात विनय

आपल्या शेतीतील पिकांविषयी बोलताना विनय यांनी सांगितले की, एका शेतात टोमॅटो, कारले आणि भोपळा एकाच वेळी लावण्यात आलाय. विनय म्हणतात की, ठिबक सिंचनाद्वारे शेती केल्याने पिकाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे होण्याची अपेक्षा असते. विशेषतः तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने मजुरही कमी लागतात.

इंजिनिअरची नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरु केले मशरूम उत्पादन! आता करतो लाखोंची कमाई

पाण्याची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळते

शेतकरी विनय यांनी सांगितले की, उद्यान विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना राबविली जात आहे. प्रत्येक थेंब वापरणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ठिबक सिंचन योजनेंतर्गत 90 टक्के अनुदान मिळते. एक एकरमध्ये हा प्लांट उभारण्यासाठी पूर्वी 90 हजारांपर्यंत खर्च येत होता. तर 45 हजार अनुदान उपलब्ध होते. आता या योजनेतून शेतकऱ्यांना एकरी 80 हजारांपर्यंत अनुदान मिळते.

First published:
top videos

    Tags: Farmer