जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Business Idea: तासभरात लागेल पुऱ्यांचा ढीग, या मशीनच्या मदतीने सुरु करा पाणीपुरीचा बिझनेस!

Business Idea: तासभरात लागेल पुऱ्यांचा ढीग, या मशीनच्या मदतीने सुरु करा पाणीपुरीचा बिझनेस!

बिझनेस आयडिया

बिझनेस आयडिया

Business Idea: तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही गोलगप्पा बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. बाजारात गोलगप्पा बनवण्याची अनेक यंत्रे उपलब्ध आहेत, ज्यामुळे कमी वेळात मोठ्या प्रमाणात गोलगप्पे बनवू शकता. हा तुमच्यासाठी कमी खर्चात चांगला फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 जून : पाणीपुरी कोणाला आवडत नाहीत? याला कुणी गुपचूप म्हणतं तर कुणी गोलगप्पा म्हणतं. पाणीपुरीचं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी येतं. आजकाल तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर पाणी पुरीचा गाडा नक्कीच सापडतो. पण याच्याशी संबंधित कोणताही व्यवसाय करण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर, आम्ही तुम्हाला अशाच पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्याच्या मशीनबद्दल सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही एका तासात हजारो पुऱ्या बनवू शकता. तुम्हाला असा व्यवसाय करायचा असेल ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवता येईल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पाणीपुरीची वाढती मागणी पाहता आजकाल अशी अनेक मशीन्स बाजारात आली आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही सहज पुऱ्या बनवू शकता. तुम्ही पाणीपुरी तयार करण्याचा व्यवसाय कसा सुरु करु शकता हे आपण आज जाणून घेणार आहोत.

असा सुरु करा बिझनेस

तुम्हाला हा पुऱ्या बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला यासाठी गोलगप्पा बनवण्याचे मशीन आणि कच्चा माल लागेल. तुम्ही गोलगप्पा मेकिंग मशीन ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारे खरेदी करू शकता. यानंतर तुम्हाला पीठ, रवा, तेल, बेकिंग सोडा, मीठ इत्यादी आवश्यक गोष्टी लागतील. तुम्ही त्यांना जवळच्या बाजारातून घाऊक दराने एकत्र खरेदी करू शकता. हे मशीन बसवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या सोयीनुसार कोणतीही जागा निवडू शकता.

Business Idea: कमी पैशांत सुरु होईल बिझनेस, दरमहा होईल 50 हजारांची कमाई, अशी करा सुरुवात

किती रुपयांची आहे मशीन?

बाजारात अनेक प्रकारची पाणीपुरी बनवण्याचे मशीन्स उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 35 हजारांपासून सुरू होते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार मशीन निवडू शकता. यात ऑटोमेटिक, सेमी-ऑटोमेटिक आणि पूर्णपणे मॅन्युअल अशा तीन प्रकारच्या मशीन्सचा समावेश आहे. जर तुम्ही सुरुवातीच्या रेंजमधील मशीनसह हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्यात सुमारे 50,000 रुपये गुंतवावे लागतील.

Business Idea: शेतीसोबत साइड इन्कम म्हणून सुरु करा हे काम, होईल लाखोंचं उत्पन्न

विक्री कशी होईल?

पाणीपुरीच्या पुऱ्या बनवल्यानंतर तुम्ही बाजारातल्या मोठ्या किंवा छोट्या चाट सेंटरमधून ते विकण्यासाठी ऑर्डर घेऊ शकता. यासोबतच तुम्ही मोठ्या किराणा दुकानांना देखील पुरवू शकता. यासोबतच, तुम्ही याची छोटी पॅकेट्स बनवून बाजारात विक्रीसाठी पाठवू शकता कारण आजकाल घरच्या घरी गोलगप्पा बनवण्याचा ट्रेंडही लोकांमध्ये वाढतोय. अशा वेळी बाजारात छोट्या पाकिटांनाही खूप मागणी आहे. अशा प्रकारे तुम्ही या व्यवसायातून भरपूर कमाई करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात