'हा' व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मोदी सरकार देईल अर्ध्यापेक्षा जास्त पैसे

'हा' व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मोदी सरकार देईल अर्ध्यापेक्षा जास्त पैसे

Cow, Business - तुम्हाला व्यवसाय करायचाय? मग सरकार मदत करत असणाऱ्या व्यवसायाबद्दल जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर चांगली बातमी आहे. गायीचं शेण आणि गोमूत्र यांच्यापासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनासाठी मोदी सरकार अर्ध्यापेक्षा अधिक पैसे देणार आहे. डेअरीबरोबर शेण आणि गोमूत्रापासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या स्टार्टअपला सरकार 60 टक्के पैसे देईल.

बजेटमध्ये झाली होती कामधेनू आयोगाची घोषणा

अंतरिम बजेटमध्येच सरकारनं राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. त्यावेळी 500 कोटी रुपये देण्याची घोषणा झाली होती.राष्ट्रीय कामधेनू आयोग पशुचिकित्सा, पशू विज्ञान, कृषी विश्वविद्यालयाच्या सहकार्यानं काम करेल. ते गायचं पजनन, पालन, जैविक खाद्य, बायोगॅस या गोष्टींत कार्यरत आहेत.

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून मोफत होतील बँकेच्या 'या' सेवा

औषधं आणि कृषी कामांमध्ये वापर

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार डेअरीसोबत गायींचं शेण आणि गोमूत्रापासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या व्यवसायासाठी सरकार 60 टक्के फंड देणार. काऊ बोर्डाचे अध्यक्ष वल्लभ कठेरिया यांच्या म्हणण्याप्रमाणे तरुणांना या व्यवसायासाठी प्रोत्साहित केलं जाईल. गायीचा उपयोग फक्त दूध आणि तुपासाठी न करता, गोमूत्र आणि शेणापासून औषधं तयार करायला केला जाईल.

पाकिस्तानात हाहाकार! दूध झालं पेट्रोलपेक्षा महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क

पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातले दर

गोशाळा चालवणाऱ्यांना दिलं जाईल ट्रेनिंग

कठेरिया यांनी सांगितलं की गोमूत्र आणि गायीचं शेण याचा उद्योग सुरू करण्यावर प्रोत्साहन दिलं जाईल. शिवाय ज्या गायी दूध देत नाहीत त्या या उद्योगासाठी देण्यासाठी सांगितलं जाईल. अशा बाय प्राॅडक्टच्या रिसर्चर्स आणि स्काॅलर्सना एक प्लॅटफाॅर्म मिळेल. असा उद्योग करणाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित केला जाईल.

VIDEO : भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं, सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या