मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI मध्ये उघडा जन धन बचत खाते, मिळेल 2 लाखांपर्यंतचा असा फायदा

SBI मध्ये उघडा जन धन बचत खाते, मिळेल 2 लाखांपर्यंतचा असा फायदा

sbi

sbi

केंद्र सरकारच्या जन धन योजनेअंतर्गत (PMJDY) भारतात 41 कोटी 75 लाख खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 35 कोटी 95 लाख खाती कार्यरत असल्याची माहिती केंद्रानं दिली आहे. तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI मध्ये देखील जन धन खाते काढू शकता

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

दिल्ली, 12 फेब्रुवारी: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक योजना आणली आहे. जन धन योजनेअंतर्गत खातं असणाऱ्या खातेधारकांनी SBI RuPay Jan Dhan Card साठी अर्ज केल्यास मोठी ऑफर मिळणार आहे. यामध्ये या खातेधारकांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे. याबाबत ट्वीट करत बँकेने माहिती आहे. या ट्वीटमध्ये बँकेनं यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची ही योग्य वेळ असल्याचं आणि SBI RuPay Jan Dhan Card साठी अर्ज करण्याचं आवाहन बँकेनं आपल्या केलं आहे.

केंद्र सरकारच्या जन धन योजनेअंतर्गत (PMJDY) भारतात 41 कोटी 75 लाख खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 35 कोटी 95 लाख खाती कार्यरत असल्याची माहिती केंद्रानं दिली आहे. या योजनेअंतर्गत खातेधारकांना खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं बंधनकारक नाही. यामध्ये त्यांना सूट देण्यात आली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना देखील विविध बँकिंग सेवांचा लाभ घेता यावा म्हणून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. हे खातं बँकेत पैसे भरणे, काढणे, नेट बँकिंग, विमा आणि पेन्शन थेट खात्यात जमा करण्यासारख्या गोष्टींमध्ये फायदेशीर ठरणार आहे.

कोण उघडू शकतो खाते आणि आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत कोणताही 10 वर्षांपुढील भारतीय नागरिक खातं उघडू शकतो. यासाठी आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN), रहिवासी पुरावा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. याचबरोबर केवायसीसाठी(KYC) देखील हीच कागदपत्र लागणार आहेत. या योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर तुम्हाला विविध फायदे देखील मिळणार आहेत. यामध्ये 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळण्याबरोबरच अनेक सुविधांचा लाभ मिळत आहे.

(हे वाचा-Gold Price Today: आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, वाचा काय आहेत नवे दर)

या खात्यांतर्गत मिळणाऱ्या इतर सुविधा

-सरकारकडून मिळणारी सबसिडी आणि इतर योजनेचे पैसे थेट या खात्यात जमा होतात.

-या खात्यासोबत मोबाईल बँकिंगची सुविधा देखील मिळते

-2 लाखांपर्यंत अपघाती विमा

-30 हजार रुपयांचा जीवनविमा कव्हर

-रूपे डेबिट कार्ड वापरून व्यवहार करू शकतात.

-देशभरात कुठेही पैसे पाठवू शकता

-या खात्यामधून व्यवहार करून तुम्ही विमा, पेन्शन आणि अनेक सुविधा मिळवू शकता.

First published:

Tags: Bank, Business News, Money, Pradhan mantri jan dhan yojana, SBI, Sbi account, SBI Bank News