नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय बाजारात 12 फेब्रुवारी रोजी सोन्याचे भाव स्थीर पाहायला मिळत आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिलसाठी सोन्याची वायदे किंमत 0.07 टक्क्यांनी कमी झाली आहे, परिणामी हे दर 47,475 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहे. चांदीची मार्चमधील वायदे किंमत 0.16 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर चांदीचे दर 68,600 रुपये प्रति किलोग्राम या स्तरावर ट्रेड करत आहेत. जाणकारांच्या मते अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि बिटकॉइनच्या दरात तेजी आल्यामुळे सोन्याचांदीमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर काही काळासाठी 47,200 या स्तरावर ट्रेड करतील. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर एका टक्क्याने तर चांदीचे दर 0.33 टक्क्यांनी कमी झाले होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, त्यामुळे या सर्वोच्च स्तरावरुन सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी झाले आहेत.
(हे वाचा-कर्ज घेणार असाल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, लोन मिळवताना ठरेल फायद्याचे)
याआधीही अनुमानानुसार अमेरिकेत रोजगाराच्या कमकुवत आकडेवारीनंतर सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या होत्या. एप्रिलसाठी सोन्याचे वायदा प्रति औंस 1,826.80 डॉलर होते. तर मार्च महिन्यातील चांदीचा वायदा दर औंस 27.04 डॉलर होता. देशांतर्गत बाजारातही दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि बिटकॉइनच्या दरात तेजी आल्यामुळे सोन्याचांदीमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. मात्र दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी, अमेरिकन प्रोत्साहन पॅकेज इत्यादी बाबींमुळे सोन्याच्या किंंमतीला सपोर्ट मिळत आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 1,800 डॉलर प्रति औंसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 47,200-47,055 रुपये प्रति तोळाच्या आसपास राहतील तर चांदीचे दर 68,100-67,400 रुपये प्रति किलोच्या आसपास राहतील.
(हे वाचा-गच्चीवर केशराची शेती करत दोघांनी लाखो कमावले, युट्युब गुगलला बनवलं गुरू!)
दरम्यान काही तज्ज्ञांचं असं मत आहे की चीनमध्ये लुनार न्यू इयर असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव वधारण्याची शक्यता आहे. भारत सरकारकडून सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्याने मागणी वाढली आहे, परिणामी सोन्याच्या किंमतीला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today, International, Money, Multi exchange commodity