• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • पाकिस्तान कंगाल होणार? कोरोनामुळे हे संकट ओढावण्याची दाट शक्यता

पाकिस्तान कंगाल होणार? कोरोनामुळे हे संकट ओढावण्याची दाट शक्यता

कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये Budget Deficit ऐतिहासिक स्तरावर पोहोचण्याची शक्यता असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 एप्रिल : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ने पाकिस्तानला सावध केले आहे की कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus Pandemic) चालू आर्थिक वर्षात त्यांची वित्तिय तूट (Budget Deficit) राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या 9.2 टक्के किंवा  4,000 अब्ज (23.7 अब्ज डॉलर)वर पोहचू शकतो. हेल्थ सेक्टरवर पाकिस्तानने खर्च वाढवावा IMFने बुधवारी पश्चिम आशिया आणि मध्य आशियातील क्षेत्राबाबत आर्थिक अनुमान जारी केला.  हेल्थ सेक्टरवरील खर्च वाढवण्याचा सल्ला आयएमएफने पाकिस्तानला दिला आहे. कारण या क्षेत्रामध्ये पाकिस्तान सर्वात खालच्या स्तरावर आहे. 'एक्सप्रेस ट्रिब्यून’ ने या रिपोर्टनुसार सांगितले आहे की, या क्षेत्रातील सर्वच देशांचा खर्च कोरोना व्हायरसमुळे वाढणार आहे. (हे वाचा-'हापूस'च्या युरोपवारीवर कोरोनामुळे बंधनं, बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण) अहवालामध्ये देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, कोरोना व्हायरस पाकिस्तामध्ये शिरण्याआधी पाकिस्तानमध्ये Budget Deficit जीडीपीच्या 7.3 राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता ही तूट वाढून 9.2 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. आधीच्या अंदाजापेक्षा 800 अब्ज रुपये अधिक नुकसान होणार आहे. पाकिस्तानात महागाईचा दर यावर्षी 11.1 राहण्याची शक्यता आयएमएफच्या अहवालात सांगण्यात आले आहे. अर्थमंत्रालयातील सूत्रांच्या आधारे महसूल कमी झाल्यामुळे Budget Deficit वाढण्याची शक्यता  आहे. कारण सरकारने आतापर्यंत अर्थसंकल्पीय खर्चात अद्याप कोणतीही वाढ केलेली नाही.  पाकिस्तानमध्ये यामुळे निर्माण होणारे नुकसान हे इतिहासातील सर्वाधिक असेल. (हे वाचा-सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये जवळपास 1000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे भाव) आयएमएफने पाकिस्तानला आधीच सूचना दिली होती की, या फिस्कल वर्षात पाकिस्तान मंदीकडे झुकेल. वाढीचा दर देखील मंदावण्याची शक्यता आहे. वाढीचा दर पुढील आर्थिक वर्षात वाढण्यापूर्वी तो यावर्षी 1.5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: