नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊमुळे देशातील सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. दरम्यान बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती शुक्रवारी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. सर्वाधिक किंमतीवर पोहोचलेलं सोनं प्रति तोळा 964 रुपयांनी कमी झाल्यामुळे सोन्याची किंमत प्रति तोळा 45,964 रुपये इतकी झाली आहे. दरम्यान वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीने आजही नवीन रेकॉर्ड रचला. वायदे बाजारात सोन्याची किंमत 47,000 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती रेकॉर्ड रचत आहेत.
#Gold and #Silver Opening #Rates for 17/04/2020#IBJA pic.twitter.com/DIt2bLqMTd
— IBJA (@IBJA1919) April 17, 2020
त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत 1090 रुपये प्रति किलोंनी कमी होत 42,460 रुपयांवर पोहोचली आहे. देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे देशातील सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. दिल्लीतील सराफा बाजारही यावेळी बंद आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम सोने व्यापारावर होत आहे. सध्या लग्नसमारंभ किंवा इतर सोहळे रद्द झाल्यामुळे सोन्याची मागणी देखील कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना वगळल्यास केंद्रीय बँका, फंड मॅनेजर्स, स्वतंत्र गुंतवणूकदार जगभरातील विविध एक्सचेंजवर सोन्याची खरेदी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे भारतातही गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. अन्य बातम्या लॉकडाऊनमध्ये तुमची नोकरी गेली किंवा पगार कापला तर थेट पंतप्रधान घेणार आढावा COVID-19 : बँक, कृषि क्षेत्र आणि सामान्य नागरिकांसाठी RBIचे महत्त्वाचे निर्णय Lockdown 2-अर्थव्यवस्थेचे 17.58 लाख कोटींचे नुकसान,GDP वाढ शून्य राहण्याचा अंदाज संपादन- जान्हवी भाटकर