Home /News /money /

'हापूस'च्या युरोपवारीवर कोरोनामुळे बंधनं, फळांच्या राजाचे उत्पादन करणारे शेतकरी हवालदिल

'हापूस'च्या युरोपवारीवर कोरोनामुळे बंधनं, फळांच्या राजाचे उत्पादन करणारे शेतकरी हवालदिल

कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षी मोठा फटका बसणार आहे तो आंबा बागायतदारांना. कोव्हिड-19 (COVID-19) मुळे देशातील आंब्याला युरोपातून मिळणारी ऑर्डर बंद झाली आहे.

    ओम प्रकाश, नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षी मोठा फटका बसणार आहे तो आंबा बागायतदारांना. कोव्हिड-19 (COVID-19) मुळे देशातील आंब्याला युरोपातून मिळणारी ऑर्डर बंद झाली आहे. देशांतर्गत बाजारातही सप्लाय चेन तुटली आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांवर होणार आहे. ज्याठिकाणी आंबे तयार आहेत, तिथे सुद्धा आंब्याची विक्री होत नाही आहे. काही ठिकाणी आंब्याचा पुरवठा न होण्याची महत्त्वाची कारणं आहेत ती म्हणजे- कोरोना आणि पोलीस. लॉकडाऊनमध्ये शेतीविषय कामं सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांकडे यासाठी कोणताही पास नाही मिळत आहे. परिणामी पोलिसांकडून त्यांचे ट्रक अडवण्यात येत आहेत. (हे वाचा-सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये जवळपास 1000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे भाव) दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मजूर आणि खत न मिळाल्यामुळे बागायतदारांना बागांची निगराणी राखणं कठीण झालं आहे. तर सर्वात उत्तम आणि महागड्या हापूस आंब्याचं उत्पादन करणारे बागायतदारही आंबा एक्सपोर्ट होत नसल्यामुळे हवालदिल आहेत. आंबा एक तृतियांश दराने स्थानिक मार्केटमध्ये विकण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे. निर्यात थांबल्यामुळे 'हापूस'मधून यावर्षी मिळणार उत्पन्न अत्यल्प असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (हे वाचा- COVID-19 : बँक, कृषि क्षेत्र आणि सामान्य नागरिकांसाठी RBIचे महत्त्वाचे निर्णय) मँगो ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष इंसराम अली यांनी न्यूज18 शी बोलताना अशी माहिती दिली की एप्रिलमध्ये आंबा बाजारात दिसू लागतो. मात्र सध्या कोरोनामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रानंतर आंध्रप्रदेशमध्ये आंब्याचे उत्पादन सर्वाधिक होते. त्याठिकाणी देखील बंगपाली, तोतोपुरी, नीलम याप्रकारचे आंबे तयार आहेत. त्यांच्या विक्रीबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आंबा उत्पादक शेतकऱ्याचे सर्वात जास्त नुकसान होईल. पोलिसांनी आंबा उत्पादकांचा ट्रान्सपोर्ट थांबवू नये याकरता शेतकऱ्यांना पास देणे आवश्यक असल्याचं अली म्हणाले. निम्म्या किंमतीत विकला जातोय हापूस बाहेरच्या देशात सर्वाधिक निर्यात होणार हापूस सध्या देशांतर्गत बाजारातच विकला जात आहे. हापूसच्या किंमतीमध्ये 50 टक्क्यांनी घसरण झाली आहे. रिटेल बाजारात 1200 ते 1500 रुपये डझन दराने विकला जाणारा हापूस सध्या 500 ते 700 रुपये डझनने विकला जात आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड, देवगड आणि कोकणातील इतर काही भागात हापूस बागा आहेत. याठिकणच्या बागायतदारानुसार हापूसच्या किंमती गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी झाल्या आहेत. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या