नवी दिल्ली, 28 जानेवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने मोबाइल अॅप (Budget 2022 Mobile App) सुरू केले आहे. संपूर्ण बजेट या अॅपवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लवकरच या अॅपवर बजेट उपलब्ध होईल. मोबाईल अॅपवर यूजर्स त्यांच्या सोयीनुसार बजेट हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पाहू शकतील. युनियन बजेट मोबाईल अॅप (Union Budget Mobile App) असे या अॅपचे नाव आहे. बजेट अॅप http://indiabudget.gov.in वरून डाउनलोड करता येईल. LIC IPO बाबत सस्पेन्स संपला! वाचा केव्हा येणार हा मेगा आयपीओ? लवकरच आहे कमाईची संधी संसद अॅपवर बजेट लाईव्ह पहा बजेट 2022 मोबाईलवर लाईव्ह देखील पाहता येईल. यासाठी डिजिटल संसद नावाचे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, डिजिटल संसद अॅपवर (Digital Sansad App) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, सभागृहांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, तसेच सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणारे पत्र तसेच 1947 पासून आतापर्यंत अर्थसंकल्पावर चर्चा देखील येथे उपलब्ध आहेत. या अॅपवर तुम्ही सर्वसाधारण बजेट लाईव्ह पाहू शकाल. तुमच्या कामाची बातमी! Ratıon Card वर डीलर कमी धान्य देतोय? या नंबरवर लगेच करा तक्रार पहिल्यांदाच हलवा सेरेमनी रद्द दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सेरेमनी’ यावेळी ओमिक्रॉनमुळे रद्द करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ही प्री-बजेट परंपरा पाळली जात नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. अर्थसंकल्प 2022 ची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका आणि हेल्थ प्रोटोकॉल लक्षात घेऊन यावेळी मुख्य कर्मचाऱ्यांना मिठाई वाटण्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच ‘लॉक इन’ मोडमध्ये ठेवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.