Home /News /money /

LIC IPO बाबत सस्पेन्स संपला! वाचा केव्हा येणार हा मेगा आयपीओ? लवकरच आहे कमाईची संधी

LIC IPO बाबत सस्पेन्स संपला! वाचा केव्हा येणार हा मेगा आयपीओ? लवकरच आहे कमाईची संधी

अनेक गुंतवणूकदार या LIC आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. गुंतवणूकदारांची उत्कंठा वाढवणाऱ्या एलआयसीच्या (Upcoming IPO List) मेगा आयपीओबाबत एक महत्त्वाची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 28 जानेवारी: गेल्या वर्षभरात आयपीओ (Latest IPO) हे विशेष चर्चेत राहिले. काही कंपन्यांच्या आयपीओंमुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळाला तर काही कंपन्यांच्या आयपीओंमुळे गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागलं. गेल्या वर्षी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमचा (Paytm IPO) आयपीओ विशेष चर्चेत राहिला. हा आयपीओ गतवर्षातील सर्वांत मोठा आयपीओ ठरला. मात्र पेटीएमचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी विशेष लाभदायी ठरला नाही. पेटीएमप्रमाणेच नायका कंपनीच्या आयपीओची जोरदार चर्चा झाली. या आयपीओनं गुंतवणूकदारांना अपेक्षित रिटर्न्स दिले. गतवर्षाच्या अखेरीपासून एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) गुंतवणूकदारांमध्ये जोरदार चर्चा आहे. अनेक गुंतवणूकदार या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. गुंतवणूकदारांची उत्कंठा वाढवणाऱ्या एलआयसीच्या (Upcoming IPO List) मेगा आयपीओबाबत एक महत्त्वाची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India) मेगा आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेनं वाट पाहात आहेत. मार्चअखेर एलआयसीचे शेअर बाजारात (Share Market Latest News) लिस्ट होतील, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. हे वाचा-तुमच्या कामाची बातमी! Ratıon Card वर डीलर कमी धान्य देतोय? या नंबरवर करा तक्रार आयपीओसाठी SEBI कडे लवकरच कागदपत्रे सादर केली जाणार एलआयसीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओ संदर्भात कागदपत्रांचा मसुदा अंतिम केला जात आहे. लवकरच ही कागदपत्रे मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडे (SEBI) जमा केली जातील. सरकार 31 मार्च 22 पर्यंत एलआयसीला शेअर बाजारात लिस्ट करणार डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट म्हणजेच दीपमचे (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडेय म्हणाले, 'एलआयसीच्या निर्गुंतवणुकीच्या रकमेचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, कारण 31 मार्च 22 पूर्वी एलआयसी आयपीओ लिस्ट करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे'. हे वाचा-Petrol Diesel Prices Today: इथे तपासा मुंबई-पुण्यातील आजचा पेट्रोल-डिझेल भाव सरकारचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एलआयसीचा आयपीओ खूप महत्त्वाचा आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या निर्गुंतवणुकीतून 32,835 कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सार्वजनिक उपक्रमांमधील म्हणजेच पीएसयूएसमधील अल्प हिस्सा विक्री करून 9330 कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत.
First published:

Tags: LIC, Money, Savings and investments

पुढील बातम्या