Budget 2020 : 5 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही, इनकम टॅक्समध्ये घसघशीत सवलत

Budget 2020 : 5 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही, इनकम टॅक्समध्ये घसघशीत सवलत

केंद्रीय अर्थसंकल्पात इनकम टॅक्समध्ये (Income Tax Slab Changes)मोठा दिलासा मिळाला आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पात इनकम टॅक्समध्ये (Income Tax Slab Changes)मोठा दिलासा मिळाला आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे.

असा असेल इनकम टॅक्सचा नवा स्लॅब

5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

- 5 लाख रु.ते 7.5 लाख उत्पन्न - 10 टक्के इनकम टॅक्स

- 7.5 लाख ते 10 लाख रु. उत्पन्न - 15 टक्के इनकम टॅक्स

- 10 ते 12.5 लाख रु. उत्पन्न - 20 टक्के इनकम टॅक्स

- 12.5 ते 15 लाख रु. उत्पन्न - 25 टक्के इनकम टॅक्स

- 15 लाख रु. जास्त उत्पन्न - 30 टक्के

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यानंतर पर्सनल इनकम टॅक्समध्ये सवलतीची मागणी जोर धरत होती. अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा वाढवण्यासाठी लोकांची क्रयशक्ती वाढणं गरजेचं होतं. त्यामुळेच ही सवलत देण्यात आली आहे.

============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2020 01:13 PM IST

ताज्या बातम्या