मराठी बातम्या /बातम्या /मनी /वडाखाली भरणारा शेअर बाजार ते इंटरनेट युग! Bombay Stock Exchange ला 146 वर्ष पूर्ण

वडाखाली भरणारा शेअर बाजार ते इंटरनेट युग! Bombay Stock Exchange ला 146 वर्ष पूर्ण

भारतात National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) हे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यापैकी बीएसई हा आशियातील सर्वांत जुना शेअर बाजार आहे. आज बीएसईच्या स्थापनेला 146 वर्षं पूर्ण झाली आहेत.

भारतात National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) हे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यापैकी बीएसई हा आशियातील सर्वांत जुना शेअर बाजार आहे. आज बीएसईच्या स्थापनेला 146 वर्षं पूर्ण झाली आहेत.

भारतात National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) हे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यापैकी बीएसई हा आशियातील सर्वांत जुना शेअर बाजार आहे. आज बीएसईच्या स्थापनेला 146 वर्षं पूर्ण झाली आहेत.

  मुंबई, 09 जुलै: शेअर बाजार म्हटलं की सामान्य माणसांना आठवतो तो बुल किंवा हर्षद मेहता किंवा होणारा तोटा, वरखाली होणारे आकडे. पण शेअर बाजारात दररोज नफा कमवाणारे पण अनेकजण आहे. अनेकांना हा सट्टा बाजार वाटतो त्यामुळे ते त्याबदद्ल माहिती जाणून घ्यायलाही उत्सुक नसतात. भारतात National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) हे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यापैकी बीएसई हा आशियातील सर्वांत जुना शेअर बाजार आहे. मुंबईतील दलाल स्ट्रीटवर बीएसईची इमारत आहे. इथंच भारतातील शेअर्स आणि इतर कमॉडिटींच्या खरेदी-विक्री बाजार भरतो. बीएसईच्या स्थापनेला 146 वर्षं पूर्ण झाली असून आजही तो महत्त्वाचा शेअर बाजार आहे.

  वडाच्या झाडाखाली भरायचा शेअर बाजार

  बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापन 9 जुलै 1875 एका संघटनेच्या स्वरूपात झाली. नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन असं या संघटनेचं नाव होतं. 1840 मध्ये शेअर दलाल वडाच्या झाडाखाली उभं राहून शेअर्सचे व्यवहार करायचे. त्या काळात आतासारखे डिजिटल शेअर्स नव्हते तर ते कागदपत्रांच्या स्वरूपात होते. त्यांनी एकत्र येऊन ही संघटना तयार केली आणि 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. आजही जगातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये बीएसईची गणना होते.

  हे वाचा-Amazon च्या धमाकेदार सेलला सुरुवात! AC, फ्रीजवर मिळवा आकर्षक ऑफर्स

  नंतर तयार झाला दलाल स्ट्रीट

  सध्याच्या मुंबईतील हार्निमन सर्कलच्या जवळ असलेल्या टाउनहॉल जवळ 1850 मध्ये वडाचं झाड होतं त्याखाली सौदे होत असत. 1860 मध्ये मेडोज स्ट्रीट आणि महात्मा गांधी रस्त्यावरील चौकात असलेल्या वडाच्या झाडाखाली हा बाजार भरायला लागला. 1874 मध्ये या शेअर बाजाराला नवी जागा मिळाली आणि त्यानंतर वर्षाने लोक या रस्त्यालाच दलाल स्ट्रीट या नावाने ओळखू लागले.

  का स्थापऩ झाला बाजार?

  1860 च्या दशकात मुंबईच्या परिसरात सुमारे 250 शेअर दलाल कार्यरत होते पण 1865 मध्ये अमेरिकेतील युद्धानंतर तिथून भारतात येणारी गुंतवणूक कमी झाली. दलालांना कामच राहिलं नाही. शेअरच्या किमती कोसळल्या. त्यामुळे शेअर दलालांनी आपली संघटनाच तयार केली आणि 1868 ते 1873 पर्यंत ही संघटना अनधिकृत पद्धतीने कार्यरत होती पण 1874 मध्ये त्याला निश्चित ठिकाण मिळलं.

  हे वाचा-SBI च्या या खातेधारकांना 30 लाखांपर्यंत मिळेल लाभ, आहेत हे 5 बंपर फायदे

  ..मग मागे वळून नाही पाहिलं

  1875 च्या जुलै महिन्यात 1 रुपया प्रवेश शुल्क भरून 318 जणांनी मुंबईचा शेअर बाजार चालवणारी संस्था स्थापन केली आणि तिचं नाव नेटिव्ह अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन असं ठेवलं. त्यानंतर बाजार भरवण्यासाठी वेगळी इमारत बांधण्यापासून दलालांच्या हितांचं रक्षण करण्याचं काम या संघटनेनी सुरू केलं. 1887 मध्ये या कामाला दिशा मिळाली आणि आजपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने मागे वळून पाहिलेलं नाही.

  बाजाराचा सन्मान

  ब्रिटिशांच्या काळात 18 जानेवारी 1899 ला ब्रिटिश अधिकारी जे. एम. मेक्लिन यांनी मुंबईतला शेअर बाजार अधिक चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी मदत केली. त्यांनी स्थानिक शेअर दलालांना सन्मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न केला. हा त्या काळातला भारतातला सगळ्यात मोठा गुंतवणूक बाजार होता. आजच्या मुंबईच्या उभारणीतही या शेअर बाजाराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  हे वाचा-PF संदर्भात नवी सेवा, पीएफ खात्यातून एका तासात आगाऊ काढता येतील 1 लाख रुपये

  स्वातंत्र्यानंतर आणि आज इंटरनेटयुगापर्यंत

  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 मध्ये सिक्युरिटी कॉन्ट्रक्ट रेग्युलेशन अकच्या माध्यामातून बीएसईला भारत सरकारने अधिकृत मान्यता दिली. बीएसईचा सूचकांक म्हणजे बीएसई सेन्सेक्स हा 1986 मध्ये तयार झाला. हा सूचकांक शेअर बाजाराची स्थिती दर्शवणारा एक आकडा असतो. 1990 च्या दशकात कॉम्प्युटर आला आणि त्याच दशकात शेअर बाजारात अनेक घोटाळेही झाले त्यानंतर नवे नियम आले आणि स्टॉक एक्सचेंजचा विस्तार झाला. 1995 मध्ये केवळ 50 दिवसात बीएसईत इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टिम स्वीकारली गेली आणि बीएसई ऑन लाइट ट्रेडिंग BOLT ची सुरुवात झाली. यात दिवसात 80 लाख ट्रेड करता येतात. जगात पहिल्यांदा बीएसईमध्ये सेंट्रलाइज्ड इंटरनेट ट्रेडिंग सिस्टिम सुरू करण्यात आली.

  First published:
  top videos

   Tags: BSE, Money